हटके

महिलेने एलियन सारख्या बाळाला जन्म दिल्याचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

Spread the love

नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया 

              आई होणे हे भूतलावरील सगळ्या महिलांचे स्वप्न असते. आणि त्यासाठी त्या वाट्टेल ते त्रास सहन करायला तयार असतात. आपले बाळ देखणे असावे ही प्रत्येक आईची ईच्छा असते. आजकाल जन्माला आलेल्या बाळांमध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी पहायला मिळतात. कधी दोन हात, दोन डोकं, जास्त बोटं असलेलं बाळ जन्माला येत असतं.

जन्मताच काही बाळांना अनेक आजार होतात. त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये अनेक बदल पहायला मिळतात. अशातच एक जन्मलेल्या बाळाचा एक व्हिडीओ समोर आलाय. या बाळाला पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

कारण हे बाळ एलियन सारखं दिसत आहे.एका महिलेनं एलियन सारख्या दिसणाऱ्या बाळाला जन्म दिला आहे. या बाळाचा व्हिडीओ सध्या समोर आला असून तो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. बाळाला पाहून अनेकजण चकित झाले आहेत.समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बाळ नॉर्मल बाळांपेक्षा वेगळं दिसत आहे. मुलाच्या चेहऱ्यापासून संपूर्ण शरीर पांढरे आहे.

त्याची कातडी सिमेंटसारखी असल्याचं दिसत आहे. मुलाच्या शरीरावर अनेक भेगाही दिसतायेत. त्याचे डोळे आणि तोंड लाल असून तो एखाद्या एलियन सारखा दिसतोय. असं बाळ क्वचितच जन्माला येतं.(@kbkonline)kbkonline नावाच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

अगदी काही वेळात हा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसला. या व्हिडीओ वर अनेक कमेंट येताना दिसत आहे. मुलाला हार्लेक्विन इचथायोसिस नावाचा अनुवांशिक आजार असल्यातं सांगण्यात येत आहे. या आजाराचा त्वचेवर वाईट परिणाम होतो. हार्लेक्विन इचथिओसिसने ग्रस्त असलेली बाळे अकाली जन्मलेली दिसतात. त्यांचे बहुतेक शरीर जाड आणि कडक त्वचेने झाकलेले असते, ज्यामध्ये क्रॅक दिसतात. सर्वात धक्कादायक आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या आजारावर कोणताही इलाज नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close