शाशकीय

जुना धामणगाव ग्रा. पं. मध्ये पार पडला ‘ मेरी माटी मेरा देश ‘ कार्यक्रम

Spread the love
45 माजी सैनिकांच्या स्वागतासह अनेक कार्यक्रमाचे आयोजन 
धामणगाव रेल्वे / यशवंत पाटील 
         जुना धामणगाव ग्राम पंचायत तर्फे ‘ मेरी माटी मेरा देश ‘ अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
                    देशात  स्वातंत्र्याच्या 75 वर्षा निमित्त सर्व शासकीय कार्यालयात ‘ मेरी माटी मेरा देश ‘ कार्यक्रम आयोजित करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने ग्रा. पं. जुना धामणगाव येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
               ग्रा.पं. कडून 45 माजी सैनिकांचा सत्कार घेण्यात आला त्यात माजी सैंनिकांना शाल आणि श्रीफळ देण्यात आले. पाणी पुरवठा योजनेच्या टाकी परिसरात 75 वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी देशभक्तीपर गीते गायल्या गेलीत. माजी सैनिक संघटना अध्यक्ष दिलीप दगडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर गटविकास अधिकारी मायताई वानखडे , सभापती ( पंचायत समिती) बेबीताई उईके आणि सरपंच विश्वेश्वर दिघाडे यांच्या हस्ते फोटो पूजन पार पडले.
                       ग्राम पंचायत प्रांगणात शीला फलक लावण्यात आला. माजी सैनिकांनी पंचप्राण प्रार्थना म्हटली.यावेळी शाळकरी मुलांनी देशभक्तीपर गीते गाऊन या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला.या प्रसंगी मान्यवर पाहुण्यांसह ग्राम पंचायत सदस्य आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close