Uncategorized

‘ एक फुल दो माली ‘ मध्ये युवकाची हत्या

Spread the love

‘ एक फुल दो माली ‘ मध्ये युवकाची हत्या

नागपूर / नवप्रहार मीडिया नेटवर्क

                   प्रेम त्रिकोणातून एका युवकाची हत्या घडल्याची घटना शहराच्या पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बारसे नगर भगत घडली आहे. गेल्या दोन दिवसातील खुनाची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे पोलीस विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्या जात आहे. अभिनव उर्फ शंकी महेंद्र भोयर वय २२ वर्ष असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मृत अभिनव हा बार मध्ये वेटर म्हणून काम करीत असल्याचे समजते.

 अभिनव उर्फ शंकी महेंद्र भोयर हा बारसे नगर भागातील एका चहाच्या दुकानात बसला होता. त्याचवेळी तिथे आलेल्या तिघांनी अभिनववर धारधार शस्त्रांनी वार केले. ज्यामध्ये अभिनवचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतक हा एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून कामाला होता. त्याची नाईट ड्युटी होती. सकाळी कामावरून घरी परत आल्यानंतर दुपारी चहा पिण्यासाठी दुकानात गेला असता आधीच दबा धरून असलेल्या आरोपींनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. ज्यामध्ये अभिनवचा मृत्यू झाला आहे.

 अभिनव भोयर आणि आरोपींमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू होता. यातूनच 15 दिवसांपूर्वी आरोपीने अभिनव भोयरवर हल्ला केला होता. प्रेमाच्या त्रिकोणातून घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटेनची माहिती समजताच पाचपावली पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत तीनही आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले होते. महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणातील मृतक आणि आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close