क्राइम
आईच्या तब्येतीचे कारण सांगून डॉक्टरला घरी बोलावले आणि…..

सुभाषनगर (युपी) / नवप्रहार मीडिया नेटवर्क
सध्या महिलां , तरुणी आणि पुरुषांनी मिळून लवकर कमाईचा नवीन फंडा शोधून काढला आहे. धनाढ्य सावज शोधायचे त्यांना आपल्या प्रेम जाळ्यात ओढायचे. मग त्यांच्याकडून पैशे उकळायचे असा त्यांचा धंदा होता. त्यांनी एका डॉक्टरला आपल्या जाळ्यात ओढले त्याचे आक्षेपार्ह फोटो काढले आणि त्याला पैशाची मागणी केली आणि मग झाले असे …..
या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत 22 वर्षांच्या तरुणीला अटक केली आहे. उत्तरप्रदेशमधल्या सुभाषनगरमधली ही घटना आहे. या भागात एका डॉक्टराच दवाखाना होता. काही दिवसांपूर्वी या डॉक्टरला एक फोन आला. फोन करणाऱ्या तरुणीने आपण नर्सिंगचा कोर्स केला असून नोकरीची गरज असल्याचं त्या डॉक्टरला सांगितलं. पण डॉक्टरने सध्या जागा नसल्याचं तिला सांगत फोन कट केला.
त्याच दिवशी ही तरुणी एका मैत्रिणीला घेऊन त्या डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये गेली. तीने पुन्हा डॉक्टरकडे नोकरी देण्याची विनंत केली. आपली आर्थिक परिस्थिती ठिक नसून नोकरीची गरज असल्याचं तीने त्या डॉक्टरला सांगितलं. पण नोकरी देण्यास आपण असमर्थ असल्याचं त्या डॉक्टरने तरुणीला सांगितलं. डॉक्टरला घरी येऊन तपासणीची विनंती करत ती मुलगी रडू लागली. शेवटी डॉक्टरने घरी येण्याचं मान्य केलं. मुलीने दिलेल्या पत्त्यावर पोहोचला. पण डॉक्टर घरी पोहोचताच मुलीने आपले सर्व कपडे उतरवले आणि डॉक्टरसोबर गैरवर्तन सुरु केलं. धक्कादायक म्हणजे घरात आधीच एक महिला आणि दोन पुरुश लपून बसले होते. या सर्वांनी डॉक्टरला पकडून त्याचे कपडे काढले. त्यानंतर डॉक्टरचे आणि त्या मुलीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केले.
सुरु झाला ब्लॅकमेलिंगचा खेळ
यानंतर त्या मुलीने आणि तिच्या साथीदारांनी डॉक्टरला ब्लॅकमेल करण्याचा खेळ सुरु केला. अश्लील व्हिडिओ व्हारयर करण्याची धमकी देत त्या तरुणीने सुरुवातीला डॉक्टरकडून 50 हजार रुपये घेतले. त्यानंतर पुन्हा एक लाख रुपये उकळले. ती तरुणी वेगवेगळा फोनवरुन फोन करत डॉक्टरला फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होती. तसंच सातत्याने पैशांची मागणी केली जात होती. याचा प्रचंड धसका डॉक्टरने घेतला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. कुटुंबाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरु केल्यावर संपूर्ण प्रकरण बाहेर आलं.
पोलिसांनी या प्रकरणी प्रिया गंगवार नावाच्या मुलीला अटक केली असून तिला गुन्हात मदत करणारी एक महिला आणि दोन तरुणांनाही अटक केली आहे. आरोपींच्या जबाबात धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रियाने केवळ डॉक्टरच नाही तर याआधी अशाचप्रकारे अनेकांना फसवलं होतं. यात एक भारतीय लष्कराचा जवान, आरटीओचा एक कर्मचारी तसंच इतर आठ लोकांना जवळपास सहा लाख रुपयांना लुटलं. याप्रकरणी पोलीस आता अधिक तपास करत आहेत.
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |