सामाजिक

पतीच्या अनैतिक संबंधा मुळे पत्नीने उचलले धक्कादायक पाऊल 

Spread the love

दोन मुलांसह ट्रेन खाली उडी घेत संपवले जीवन 

जोधपूर / नवप्रहार मीडिया नेटवर्क 

                अनैतिक संबंधाचा शेवट हा अत्यंत भयानक असतो. अनैतिक संबंधामुळे हत्या, खून अश्या प्रकारच्या घटना घडतात.पत्नीचा वाढदिवस असल्याने  पत्नी पतीला सरप्राईज देण्यासाठी त्याला भेटायला गेली असता तिने जे पाहिले ते पाहून तिने दोन मुलांसह रेल्वे खाली उडी घेऊन जीवन संपवले. 

टॅक्सी चालक असलेला जोधपूर जिल्ह्यातील मथानिया परिसरातील सुरेश विश्नोई हा जोधपूरच्या रतनदा भागात भाड्याच्या खोलीत राहत होता  मागील रविवारी सुरेशचा वाढदिवस असल्याने पत्नीने त्याला गावी येण्यास सांगितले. दिवसभर वाट पाहूनही तो घरी न आल्याने पत्नीने त्याला अनेकदा फोन केला. पण सुरेशने फोन न उचलल्याने पत्नी काळजीत पडली. सुरेशसोबत संपर्क न झाल्याने त्याची २५ वर्षीय पत्नी निरमा आपल्या दोन मुलांसह उमेद नगरहून जोधपूरकडे रवाना झाली.

खरं तर ती पतीला वाढदिवशी सरप्राईज देणार होती. सकाळी आठ वाजता ती पती राहत असलेल्या घरी पोहचली अन् दरवाजा ठोठावला. आपली पत्नी आणि मुलांना पाहून सुरेशला धक्का बसला. पण खोलीत पत्नी निरमा गेली असता तिलाही धक्का बसला. कारण खोलीत एक तरूणी वाढदिवस साजरा करण्यासाठी आली होती. हे दृश्य पाहून निरमा संतापली अन् तिने पतीसह त्याच्या प्रेयसीला खडेबोल सुनावले. याशिवाय तिने या घटनेचा व्हिडीओ देखील बनवला.

आपला पती अन्य एका तरूणीसोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत असल्याचे समजताच निरमाला अश्रू अनावर झाले. ती पुन्हा मथानियाकडे निघाली. पतीचे हे कृत्य सहन न झाल्याने ती अर्ध्यातूनच बस मधून उतरली. यानंतर निरमा थेट जवळच्या रेल्वे स्थानकावर गेली आणि तिने आपल्या मुलांसह फलोदीहून जोधपूरच्या दिशेने येणाऱ्या मालगाडीसमोर उडी मारून आत्महत्या केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close