गुरु पौर्णिमा ” स्कूल ऑफ स्कॉलर्स प्राथमिक मध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला.
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
श्री दत्ताजी मेघे बाल कल्याण शिक्षण संस्था संचालित द्वारा स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये ” गुरू पौर्णिमा”मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजनेने करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका के साई नीरजा होत्या . गुरु पौर्णिमाच्या निमित्ताने, रेड हाऊसने विशेष परिपाठाचे आयोजन करण्यात आले . गुरु पौर्णिमाच्या निमित्ताने, विद्यार्थ्यांनी गुरु पौर्णिमेचे महत्त्व स्पष्ट केले आणि शिक्षकांबद्दल आदर व्यक्त केला. काही विद्यार्थी गुरु द्रोणाचार्य, गुरु व्यास यांच्या वेशभूषेत आले आणि काही विद्यार्थी शिष्याच्या वेशभूषेत आले. त्यांनी गुरु पौर्णिमाबद्दल माहिती दिली. आर्गेनाईजेशन प्रदीप मांडवकर. नितीन श्रीवास आणि मयुरी लांजेवार आणि रेड हाऊसचे सदस्य स्नेहा राजपूत, चंचल इंगोल, हर्षल मनोहर, कांचन उके, प्रवीण टोन्गे , विश्वास हिंगवे आणि मुख्याद्यापिका यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्रजी शिक्षिका स्नेहा राजपूत यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांनी अथक प्रयत्न केले आणि हा कार्यक्रम यशस्वी केला.