क्राइम

स्थागुशाने यवतमाळ,परभणी, आदीलाबाद येथून नऊ मोटरसायकल जप्त

Spread the love

 

साडेसात लाख रुपये किंमतीचा 

मुद्देमाल जप्त 

 

राजेश सोनुने पुसद तालुका प्रतिनिधी । पुसद

 

 

वसंत नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुचाकी चोरीच्या घटनेमध्ये गुन्हे दाखल झाले होते. त्या दाखल गुन्ह्यातील नऊ मोटरसायकली विविध जिल्ह्यांतून स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केल्या आहेत.स्थागुनशाने यवतमाळ,परभणी,आदीलाबाद येथून मोटरसायकली ताब्यात घेतल्या आहेत.सोबतच आरोपीला देखील ताब्यात घेतले आहे.

 

करण रमेश शिंदे वय २३ वर्षे रा.अंबा भवानीनगर जि.परभणी व अवतारसिंग जंगुसिंग जुनी वय ३५ वर्षे रा.जनकापुर जि.चंद्रपूर यांच्याकडून पाच बुलेट,एक पल्सर,एक प्लेटिना,एक हिरो होंडा स्प्लेंडर अशा नऊ मोटरसायकली स्थानिक गुन्हे शाखेने साडेसात लाख रुपयांच्या दुचाकी जप्त केल्या आहेत.स्थानिक गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार परिसरातील दुचाकी चोरीच्या घटनेमध्ये मागील दिड वर्षात करण शिंदे यांच्या कडे चोरलेली बुलेट गाडी असल्याची माहिती पेट्रोलिंग दरम्यान पथकाला मिळाली होती.त्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे,अमोल सांगळे, रेवण जागृत,तेजाब रणखांब, पंकज पातुरकर,सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, बबलू चव्हाण, सुनील पंडागळे,किशोर झेंडेकर, अमित झेंडेकर,चालक अमित कुमरे यांनी सापळा रचून वाशिम रोड वरील भोजला फाटा येथे दुचाकी चोरट्याला अटक केले.दुचाकी चोरट्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडून खात्रीलायक माहिती मिळविली असता त्याने चंद्रपूर येथे राहणाऱ्या अवतारसिंग सोबत मिळून यवतमाळ,परभणी आदीलाबाद या जिल्ह्यासह दिग्रस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Pande Sanjay

Related Articles

Back to top button
Close
Close