Uncategorized

25 वर्षाच्या तरुणाने मोबाईल मध्ये असे काय पाहिले की तो पडला बेशुद्ध

Spread the love
25 वर्षाच्या तरुणाने मोबाईल मध्ये असे काय पाहिले की तो पडला बेशुद्ध
 
नवी दिल्ली / नवप्रहार न्यूज नेटवर्क 
 
                  एक 25 वर्षीय तरुण आपल्या वडिलांसोबत त्यांच्या कार्यालयात बसला असतो. इतक्यात त्याला व्हिडीओ कॉल येतो. अनोळखी नंबर वरून तो कॉल असतो. कॉल उचलतात कॉल वर असलेली तरूणी काही न बोलताच एक एक करत कपडे काढायला सुरवात करते. घडलेल्या प्रकाराने पूर्णतः गोंधळलेला तरुण आपली शुद्ध हरपतो. त्याची अवस्था पाहून आमोर बसलेले वडील त्याच्या तोंडावर पाणी मारून त्याला शुद्धीवर आणतात आणि काय घडले याची विचारणा करतात. मुलाच्या सांगण्यावरून एक्स न्यायाधीश असलेल्या वडिलांना हा ‘ सेक्सटॉर्शन ‘ चा प्रकार असल्याचे लक्षात येताच ते पोलिसात धाव घेतात.
                 आता काहींना प्रश्न पडला असेल की सेक्सटॉर्शन नेमका काय प्रकार आहे, ? तर मग पहिले या बद्दल जाणून घेऊ . सोशल मीडियावर अनोळखी नंबर वरून तुम्हाला कॉल केल्या जातो.तुम्ही उत्सुकतावश तो कॉल उचलता. समोरून महिलेचा आवाज येतो अर्थात ती तरुणी असते. ती तुमच्याशी सुरवतीला मैत्रिणी सारखी बोलते.काही दिवस बोलणे झाल्यावर ती अश्लील वार्तालाप करते. आणि स्वतः नेकेड होत तुम्हालाही नेकेड होण्यास सांगते. असे करत असताना ती तुमच्या नकळत स्क्रीन रेकॉर्डिंग करत असते. त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या नंबर वरून कॉल येतो. आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तुमच्याकडून पैशे उकळले जातात. हा प्रकार कमीत कमी  4 ते 5 वेळा होतो.
सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या मुलासोबत देखील असाच प्रकार घडला.त्यांनी  पोलिसांना दिलेल्या अहवालात सांगितले आहे की, सकाळी 9.30 वाजता कथित कॉल आला, जेव्हा ते आणि त्यांचा मुलगा सेक्टर 17 मधील त्यांच्या चेंबरमध्ये बसले होते. त्यांनी सांगितले की, कॉल येताच त्यांच्या मुलाने पाहिले की कॉलवर एक मुलगी होती, जी तिचे कपडे काढत होती. हे पाहून त्यांचा मुलगा घाबरला आणि त्याने कॉल कट केला.
सेवानिवृत्त न्यायाधीशांनी आपल्या अहवालात सांगितले आहे की, कॉल डिस्कनेक्ट होताच कॉल आणि व्हॉट्सअॅपवर पैशांची मागणी करण्यात आली. तसे न केल्यास अश्लिल फोटो इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. निवृत्त न्यायाधीश पुढे म्हणाले, “काही असामाजिक तत्व त्याच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवू शकतात आणि पैसे काढण्यासाठी त्याचा मोबाईल नंबर हॅक करू शकतात.”
 
तुमच्यासोबत असा प्रकार झाल्यास ही घ्यावी खबरदारी-  तुमच्यासोबतही असे काही घडत असेल तर तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही आणि सेक्सटोर्शनिस्टला सामोरे जाण्याची गरज नाही. यानंतर तुम्ही तुमच्या जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जा आणि आयटी अॅक्टमधील कलम 67A आणि आयपीसीच्या कलम 292 अंतर्गत अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवा. नेमक्या अशाच प्रकारे सेवानिवृत्त न्यायाधीशांनी गुरुग्रामच्या सेक्टर 18 पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close