भ्रष्ट्राचार

घाटंजी तालुक्यातील डांबरीकरनाचे काम अतिशय निष्कृष्ट दर्जाचे

Spread the love

रस्त्याचा माल सस्त्यात टाकून ईगल कंपनीचे ठेकेदार झाले मालामाल.

घाटंजी तालुका प्रतिनीधी- सचिन कर्णेवार

घाटंजी बस स्टँड पासून ते पारवा नाका पर्यंत सध्या रस्ता खोदकाम पासून ते गिटी मूरुम व डांबरीकरण पर्यंत पूर्ण काम निष्कृष्ट दर्जाचे झाले आहे.तसेच मारेगाव पाईट पासून सत्र न्यायालयापर्यंत पूर्ण काम निष्कृष्ट दर्जाचं असून माती टाकून काम केले असून खोदकाम केलेले गिटा मूरुम हे स्वमर्जीणे संमधीत ठेकेदार व चेले चपाटे कडून बाहेर विकल्या गेले. आताचं रस्त्यावर खड्डे पडले आहेत अजून एक पाऊल झाला नाही तर हे हाल. एका महिन्यात जर खड्डे पडत असेल तर रोड किती दिवस टिकणार अशी चर्चा जनतेतून होत आहे. डांबरीकरण रस्त्याला अनेक ठिकाणी भेगा गेल्याचे दिसत आहे. यावरून हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा पष्ट दिसत असून त्याबद्ल नागरिकांची ओरड आहे. या एक किलोमीटर रस्त्याच्या कामात तहसील कार्यालयासमोर एक ते दिड किलोमीटर पर्यंत दोन लेयर टाकण्यात आले असून गावाच्या बाहेर काही अंतरावर दोन लेयर टाकून कंत्राटदार मोकळे झाले असून संबंधित विभागाला याबाबत देखील माहीती नाही का?.की जाणून बुजून दूर्लक्ष केल्या जात आहे.थातूर मातुर काम केल्याने या नुकत्याच काम केलेल्या रस्त्याला भेगा व खड्डे पडल्या गेले संबंधित ठेकेदाराने केलेले काम निकृष्ट दर्जाचे केल्यानेच या रस्त्याला ठिक ठिकाणी तडा गेल्या असल्याची चर्चा घाटंजी परिसरात सुरू आहे. घाटंजी ते पांढरकवडा या मार्गांवरील नूक्ती जवळ झालेल्या डांबरीकरण रस्त्याला अनेक ठिकाणी तडे गेले. यात नूक्ती ३ किलोमीटर मध्ये घाटंजी पासून काही अंतरा पर्यंत ठेकेदाराने केलेल्या कामाला जास्त ठिकाणी तडे गेले. संबंधित विभाग’ या चिरा पडलेल्या ठिकाणे नवीन काम करणार का? असा प्रश्न वाहन चालकांना पडला आहे. झालेल्या डांबरी रस्त्याबाबत
सार्वजनिक बांधकाम विभाग यांना विचारणा केली असता त्यांचे कामाकडे दुर्लक्ष आहे सोबतचं त्यांनी स्पष्ट भाषेत सांगितले कि ईगल कंपनी हे आमचं ऐकून घ्यायला तयार नाही हे काम मोठ्या नेत्याचे आहे आमचं कोणीही काही करू शकत नाही असे ईगल कंपनीचे मॅनेजर इंजिनियर बोलतात. आणि त्यांचा सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा एक टक्का ही या कामांमध्ये सहभाग नाही असे बोलत असून मोकळे होतात.या पद्धतीने घाटंजी परिसरात निष्कृष्ट दर्जाचे काम ईगल कंपनी करीत असून यांना सुधारणा करण्यासाठी पत्रकारांनी बऱ्याच तक्रारी संबंधित निकृष्ट कामाची बातमी आपल्या वृत्तपत्रात प्रसारित केलेल्या असूनही तरी,पण त्याच्यावर कोणी ॲक्शन घेतले नसल्याने करोडो रुपयाची कामे करणारी ईगल कंपनी आपली मनमानी करीत असून साधारणतः चार ते पाच वर्षे झाले असून त्याच पद्धतीने संत गतीने काम चालू असून वारंवार बोलून सुद्धा ठेकेदार ऐकायला तयार नाही. लाखो रुपयाचा मुरूम,गोटा ,गीट्टा खोदकाम केलेला बाहेर विकल्या गेले असून त्या जागी माती काम करून आज रोजी रोडला भेगा पडल्या असल्याने जनतेला भविष्यात रस्ता राहणार की रस्त्यात माती! हा प्रश्न पडला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close