राजकिय
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक व सर्व घटकांचा विकास करणारा : खासदरा डॉ. बोंडे
वारकऱ्यांकरिता मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळाची स्थापना.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांना दर मह दीड हजार रुपयांचा धनराशी.
. सर्वप्रथमच शासकीय योजनांमध्ये स्त्री, पुरुषांसोबतच तृतीयपंथी हा लिंग पर्याय उपलब्ध.
वर्धा. / आशिष इझनकर
महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वतीने राज्याचा २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे. हा संपूर्ण अर्थसंकल्प सर्वसामान्य जनतेचा असल्याने सर्वसमावेशक व हा संपूर्ण देशातील विविध राज्यांच्या तुलनेतील अर्थसंकल्पापैकी विशेष असा अर्थसंकल्प आहे असल्याचे राज्यसभा खासदार व महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री डॉ अनिल बोंडे यांनी काल वर्धेतील पत्रकार परिषदेत म्हटले आहे. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा महाराष्ट्रातील सर्व घटकातील जनतेच्या गरजांचा सखोल विचार करून तयार करण्यात आलेला आहे, तसेच शासकीय योजनांना प्रत्यक्षपणे समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे असे ते यावेळी बोलत होते.
यामध्ये यावर्षी पंढरीच्या भेटीला जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांकरिता मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ‘निर्मल वारी’ करिता सुमारे ६४ कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पात विशेषतः महिलांसाठी “मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना” अंतर्गत वीस ते साठ वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दर महिन्याला दीड हजार रुपयांचा धनराशी दरवर्षी सुमारे देण्यात येणार आहे. यातच “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना” देखील राबवण्यात येणार आहे ज्या अंतर्गत पात्र कुटुंबाला वर्षातील तीन गॅस सिलेंडर मोफत महाराष्ट्र शासनाच्या तर्फे देण्यात येणार आहे. याचा लाभ संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे ५३ लाख लाभार्थ्यांना मिळणार आहे.
महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांसाठी नुकत्याच नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेत पिकाच्या नुकसानी पोटी जुलै २०२२ पासून सुमारे २४६ कोटींचा निधी शासनातर्फे देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर नुकसानीचे पंचनामे जलद व पारदर्शी पद्धतीने होण्याकरिता ही पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू करण्यात येत आहे. “नमो शेतकरी महासन्मान निधी” योजनेअंतर्गत एकूण एक कोटी शेतकऱ्यांना १६ हजार कोटींचे अनुदान देण्यात येणार आहे. “गाव तिथे गोदाम” या नवीन योजनेत पहिल्याच टप्प्यात सुमारे १०० नवीन गोदामांचे बांधकाम संपूर्ण महाराष्ट्रातील विविध ठिकाणी करण्यात येणार आहे. सिंचन प्रकल्प अंतर्गत महाराष्ट्रातील संपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने यावेळी विशेष मोहिम राबवत, येणाऱ्या दोन वर्षात ६१ प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस हाती घेतलेला आहे. ज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे ३ लक्ष हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असल्याचे डॉ बोंडे यांनी सांगितले.
युवक घटकांकरिता “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण” योजनेअंतर्गत प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा दहा हजार रुपयापर्यंत विद्यावेतन देण्यात येणार आहे. याकरिता महाराष्ट्र शासनाने सुमारे दहा हजार कोटी रुपयांचा खर्च करण्याचा आलेख तयार केलेला आहे. याचबरोबर दुर्बल घटकांसाठी विविध योजनेच्या अंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतून नागरिकांच्या दरमहा अर्थसाहयात हजार रुपयाहून दीड हजार रुपये अशी वाढ करण्यात आलेली आहे. यात विशेष म्हणजे दिवंग व्यक्तींसाठी “धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना” राबविण्यात येणार आहे. ज्या अंतर्गत पहिल्या टप्प्यांमध्येच सुमारे ३५ हजार नवीन घरकुले बांधण्यात येणार आहे. यामध्ये दिव्यांग व्यक्तींना इलेक्ट्रिक वाहनांचे वाटप देखील करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय बजेट मध्ये तृतीयपंथी धोरण २०२४ जाहीर भरती प्रक्रियेमध्ये महाराष्ट्रात सर्वप्रथमच शासकीय योजनांमध्ये स्त्री, पुरुषांसोबतच तृतीयपंथी हा लिंग पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. असे माजी मंत्री माजी कृषि मंत्री डॉ बोंडे यांनी सांगितले.
सर्वसामान्य जनतेच्या या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक घटकांचा सखोल विचार करून हा अर्थसंकल्प तयार करण्यात आलेला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले या अर्थसंकल्पाला भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी शुभेच्छा देऊन महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनते करता तयार करण्यात आलेल्या या योजनांचा प्रचार व प्रसार जास्तीत जास्त प्रमाणात करण्यात यावा अशी विनंती केली. त्याचबरोबर भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना या अर्थसंकल्पातील योजनांची माहिती घरोघरी पोहोचवण्याचे आव्हान देखील केले. या संपूर्ण पत्रकार परिषदेला राज्यसभा खासदार व माजी कृषी मंत्री डॉ अनिल बोंडे, भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, माजी खासदार रामदास तडस, उपस्थित होते.