सामाजिक

कायद्याच्या विरोधात असलेली मुलगी आता कायदयाचे रक्षण करण्यासाठी होणार सज्ज ?

Spread the love

गोंदिया :नवप्रहार न्यूज नेटवर्क

              भूतकाळात नक्षल चळवळीचा हिस्सा असलेली एक तरुणी आता शिक्षा घेऊन पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून स्वप्न साकार करण्यासाठी त्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. आता नुकतीच तिने 12 ची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. आणि ती भविष्यात कायद्याचे रक्षण करण्यासाठी सज्ज होत आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील दुर्गम लव्हारी गावातील राजुला रवेलसिंग हिदामी असे या मुलीचे नाव आहे. राजुला हिला जबरदस्तीने पळवून नेऊन नक्षलांच्या छावणीत भरती करण्यात आले. तिथे तिला बंदुकीचे धडे देण्यात आले. कोरची- कुरखेडा- खोब्रामेंढा दलमसह तिच्या दोन वर्षांच्या सहवासात बंडखोरांनी तिला शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण दिले. ती सुरक्षा दलांशी झालेल्या बंदुकीच्या लढाईत सामील होती. ही तरुणी शस्त्र सोडू पाहत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांच्या गुप्तचर शाखेला मिळाली आणि त्यामुळे पोलिसांनी तिला पळून जाण्यास मदत केली.

राजुलाने तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप आठोळे यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. आठोळे यांनी तिचे पालकत्व स्वीकारले आणि तत्कालीन आयटीडीपीओ प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी यांच्या मदतीने तिला आदिवासी निवासी शाळेत दाखल केले. नक्षलवाद्यांमध्ये सामील होण्यापूर्वी राजुलाने इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले होते. 2018 मध्ये इयत्ता आठवीमध्ये प्रवेश घ्यायचा होता. आठोळे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन एसपी हरीश बैजल, एपीआय कमलेश बच्चव, पीएसआय चंद्रहास पाटील हेडकॉन्स्टेबल ओमप्रकाश जामनिक, चंद्रशेखर गणवीर आणि रमेश मोहुर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली राजुलाने 2021 साली मध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आणि आता ती बारावीत देखील 45.83 टक्के गुणांसह उत्तीर्ण झाली आहे.

एसपींच्या हस्ते सत्कार –  राजुलाला पोलीस दलात भरती व्हायचे आहे. कारण तिला शिक्षणाचे महत्त्व पटले आहे. आज गोंदियाचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी राजुला हिदामीचे बारावी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close