पत्रकार जावेद यांना राज्यस्तरीय सामाजिक पत्रकारिता पुरस्काराणे सन्मानित करण्यात आले
अंजनगाव सुर्जी, ( मनोहर मुरकुटे)
महाराष्ट्रात सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी अनंत बहुद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने प्रतीवर्षी राज्यातील विविध क्षेत्रात नावीन्यपूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्तींचा राज्यस्तरीय पुरस्काराणे सन्मानित करण्यात येते यामध्ये पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील जावेद शाह यांचा यंदाचा राज्यस्तरीय सामाजिक पत्रकारिता पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
अहमदनगर येथे संपन्न या सोहळ्यात पत्रकार जावेद शाह यांना सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.दि १७ मे रोजी अहमदनगर येथे संपन्न या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विधान परिषद आमदार राम शिंदे होते तर अहमदनगर चे आमदार संग्राम भैया जगताप, जेष्ठ पत्रकार नंदकुमार सातपुते, संस्थेचे अध्यक्ष एस एच बेग आणि एन टी व्ही वृत्तवाहिनीचे संपादक इकबाल शेख आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.