गुन्हेशाखा, युनिट क्र. १ पोलीसांची कामगिरी :- घातक शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीस अटक
नागपूर / प्रतिनिधी
दिनांक. १४.०५.२०२३ चे १७.३० वा. चे सुमारास गुन्हेशाखा, युनिट क. १ चे अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून सापळा रचुन पोलीस ठाणे गणेशपेठ हद्दीत मोक्षधामचे आत, मंदीरा जवळ, अॅक्टीव्हा गाडी क्र. एम.एच. ३४ बी. एन १६५० वरील ईसमास पकडण्यास गेले असता तो पळुन जात असतांना त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. आरोपीचे कमरेतुन घातक शस्त्र, एक चाकु मिळुन आला. आरोपीस त्याचे नाव विचारले असता त्याने कपिल अशोक गवरे वय ३० वर्ष रा. प्रेम फरसान मागे, गौतम नगर, पोलीस ठाणे गिट्टीखदान असे सांगीतले. आरोपी हा कोणतातरी गंभीर गुन्हा करण्याचे उद्देश्याने घातक शस्त्रासह मिळुन आल्याने त्याचे विरूध्द पोहवा . विनोद देशमुख यांचे रिपोर्टवरून पोलीस ठाणे गणेशपेठ येथे कलम ४/२५ भा. ह का सहकलम १३५ म.पो. का अन्वये गुन्हा नोंदवुन पुढील कारवाईस्तव आरोपीला जप्त मुद्देमालासह गणेशपेठ पोलीसांचे ताब्यात दिले आहे. वरील कामगिरी मा.पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन) श्री मुम्मका सुदर्शन, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. मनोज सिडाम, यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. शुभांगी देशमुख, पोउपनि दिपक ठाकरे, पोहवा, विनोद देशमुख प्रदिप पवार, पोनाअ. अजय शुक्ला, हेमंत लोनारे व सोळके यांनी केली.