योग आणि निसर्गोपचार चिकित्सावर दिल्ली एम्स मध्ये राष्ट्रीय स्तरावर सेमिनार संपन्न
अंजनगाव सुर्जी मधील मानवसेवा पैरामेडिकल कॉलेजचे विद्यार्थी सहभागी
२४ विद्यार्थ्यांचा कॉलेज कडून दिल्ली मध्ये अभ्यास दौरा आयोजीत
अंजनगाव सुर्जी ( मनोहर मुरकुटे )
अंजनगाव सुर्जी येथील महेश नगर मधील मानवसेवा पैरामेडिकल कॉलेजचे २४ विद्यार्थी दिल्ली येथील एम्स मध्ये निसर्गोपचार चिकित्सा ह्या सेमिनार मध्ये सहभागी झाले होते. हा सेमिनार दिल्ली मधील एम्स हॉस्पीटल मध्ये रविवार दि. २३ एप्रिल २०२३ ला यशस्वी झाला. होता, यावेळी कॉलेज कडून ६ दिवसांचा अभ्यास दौरा आयोजीत करण्यात आला.होता ह्या अभ्यास दौरा मध्ये दिल्लीतील राजघाट मधील अखिल भारतीय प्राकृतिक चिकीत्सा परिषदचे कार्यालय, गांधी स्मारक निधी, दिल्ली पर्यटन, एम्स रुग्णालयात एक दिवसीय सेमिनार, गाझियाबाद मधील निसर्गोपचार केन्द्र, वृंदावन मधील प्रेम मंदिर, मथुरा, आग्रा ताजमहल पर्यटन करत सर्व विद्यार्थी २६ एप्रिल ला अंजनगाव सुर्जी येथे पोहोचले होते
राजधानी दिल्लीत योग आणि नैसर्गिक चिकित्सा वर राष्ट्रीयस्तरावर सेमिनार एम्स मधील जवाहरलाल नेहरु ऑडिटोरियम मध्ये आयोजित केला होता. सेमिनारचा मुख्य उद्देश नेचुरोपैथी आणि इंटीग्रेटिव मेडिसिन हा होता. ह्याप्रसंगी सर्व तज्ञ मंडळींनी प्रोजेक्टर वर प्रेझेन्टेशन व्दारे आपले मार्गदर्शन केले.
या दरम्यान आयएनओचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अनंत बिरादार, डॉ. के पी कोचर, डॉ. तनुजा नेसरी, अधिकारी एआईआईए, डॉ. तपस्विनी प्रधान, कर्करोग अपोलो हॉस्पीटल, डॉ. राघवेंद्र राव, संचालक, सीसीआरवायएन, डॉ. संगीता नेहरा, डॉ. एम के तनेजा उपस्थित होते. सेमिनार मध्ये डॉ राघवेंद्र राव यांनी सांगितले की, या काळात योग व निसर्गोपचार वर होत असलेल्या आरोग्य संशोधन वर प्रकाश टाकला आणि निसर्गोपचार व इतर उपचार पद्धती मिळून एकत्र कार्य झाले तर आरोग्य समस्या अधिक प्रमाणात बरे होऊ शकते. डॉ तपस्विनी प्रधान यांनी कॅन्सरचे कारण व त्याचा सरळ उपाय सांगितला. डॉ के पी कोचर आधुनिक चिकित्सा विज्ञान आणि योग नेचुरोपैथीच्या आधारे जीवन शैलीशी संबंधित रोगांवर नियंत्रण मिळू शकते. डॉ तनुजा नेसरी यांनी आयुर्वेद व नैसर्गिक चिकित्सा म्हणून अन्य आधुनिक चिकित्सा पद्धती व्दारे विविध रोगांवर नियंत्रण कसे ठेवता येते या विषयी मार्गदर्शन केले. सेमिनार मध्ये जवळजवळ 1000 पेक्षा जास्त डॉक्टर, योग शिक्षक, नेचुरोपैथी डॉक्टर व निसर्गोचार सोबत जोडलेल्या व्यक्तींनी भाग घेतला. सोबतच सेमिनार मध्ये डॉ पद्मश्री सी एस पांडव, डॉ एस एन पांडेय, डॉ एम के तनेजा, डॉ. संगीता नेहरा, डॉ डी एन शर्मा, डॉ आर एस डवास उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला.