नितीन आष्टीकर यांच्या प्रयत्नात यश ; हँडपम्प दुरुस्त
आर्वी, प्रतिनिधी /पंकज गोडबोले
आर्वी : मुख्याधिकारी नगरपरिषद आर्वी ला दिनांक 29 3 2023 रोजी टाऊन हॉलमधील हॅन्ड पंप दुरुस्त करून चालू करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभा अध्यक्ष ओबीसी सेलचे नितीन आष्टीकर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले होते या प्रयत्नांना यश आले निवेदन दिल्यानंतर नगरपरिषद आर्वी च्या वतीने टाऊन हॉलमधील हॅन्ड पंप दुरुस्त करून परिसरात नळ देण्यात आले असून परिसरातील पाणीटंचाई दूर झाली आहे नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्याजवळ टाऊन हॉल आहे या टाऊन हॉलमधील हॅन्ड पंप दुरुस्त झाल्याने परिसरातील पाणी टंचाई दूर झाल्यामुळे परिसरातील दुकानदार श्री मंगेश गिरडे श्री अभय देशमुख श्री विशाल खैरकर श्री सुनील गुल्हाने श्री निलेश घाटोड श्री हरदेव साठे श्री रवि घोगरे श्री विलास ठाकरे श्री मनीष शर्मा आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व नगरपरिषद आर्वी चे मुख्याधिकारी आणि सर्व कर्मचारी यांचे आभार मानले.