हटके

अरे बाबो….. ऐकावे ते नवलच !

Spread the love

पहिलीत शिकणाऱ्या मुलावर बलात्काराचा आरोप 

मुझफ्फरनगर  / नवप्रहार न्यूज नेटवर्क

देशात घडणाऱ्या काही घटना अश्या असतात की त्यावर विश्वास करावा अथवा करू नये असा प्रश्न त्या घटना वाचल्यानंतर स्वतःलाच पडतो. पण काही वेळा मनाला पटत नसले तरी ती घटना सत्य असावी असे स्वतःचे समाधान स्वतःलाच करावे लागते. कारण त्यामागे कारण सुद्धा तितकेच सक्षम असते. आम्ही आपणाला ज्या घटनेबद्दल सांगणार आहोत ती घटना उत्तरप्रदेश च्या मुझफ्फर नगर येथे घडली आहे.अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे असे नाही तर यापूर्वी अशी घटना मध्यप्रदेश च्या इंदूर मध्ये सुद्धा घडली आहे.

  • पीडित बालिका ही तीन वर्षांची असून, ती प्ले ग्रुपची विद्यार्थिनी आहे. तर पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने त्या बालिकेला शाळेच्या टेरेसवर नेले. तेथे नेऊन त्याने तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार बालिकेच्या कुटुंबियांनी दिली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्या मुलाला ताब्यात घेतले असून, मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
  • चॉकलेटचे आमिष दाखवले अन्.

    पहिलीत शिकणाऱ्या या मुलाने 3 वर्षीय बालिका किराणा दुकानात जात असताना त्याने तिला अडवले. चॉकलेटचे आमिष दाखवून शाळेच्या टेरेसवर नेले होते. तेथे त्याने मुलीवर अत्याचार केले.

    मध्य प्रदेशातही घडली होती घटना

    विशेष म्हणजे देशात अशी भीषण घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. तर यापूर्वी मागील वर्षी, मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये अशीच एक घटना समोर आली होती. ज्यामध्ये एका 12 वर्षीय मुलाने 3 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला होता. त्यानंतर आता ही घटना समोर आली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close