रोजगार हमी योजने अंतर्गत कार्यरत कामगारांची दैनंदीनी उपस्थिती आँफलाईन करा – सौ. प्रांजली कुलट
दर्यापूर / प्रतिनिधी
रोजगार हमी योजने अंतर्गत ग्राम पंचायत स्तरावर प्रत्येक गावात २० ते १०० पर्यत कामगार काम करतात या कामामध्ये मुख्यता वृक्षसंवर्धन करणे हे मुख्य काम करत आहे. सध्या उन्हाळा सुरु आहे.वृक्षांनी पाणी घालणे गरजेचे आहे. परंतु शासनाच्या आदेशान्वये या कामगारांची दैनंदीन हजेरी ही आँनलाईन पध्दतीने नोंदविण्याचे कळविले आहे. त्यामुळे त्यांची दैनंदिन हजेरी आँनलाईन नोदविल्याशिवाय कामाचे मानधन मिळत नाही.त्या आँनलाईन अँप्स मध्ये अनेक ञुट्या आहेत त्यामुळे काम करुनही आँनलाईन नोदणी नाही झाल्यामुळे त्या दिवसाचे मानधन मिळत नाही त्यामुळे कामगार कामावर जाण्याचे टाळत आहे. त्याकरीता आपण त्या अँप्समधील ञुट्या दुर कराव्या किंवा कामगारांची दैनंदीन उपस्थिती आँफलाईन घेण्याची मागणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रो.ह.यो.यांना सौ प्रांजली कैलास कुलट युवासेना युवती (उध्दव बाळासाहेब ठाकरे)तथा सदस्या ग्राम पंचायत कार्यालय खिरगव्हाण यांनी निवेदन देवुन केली आहे.निवेदन देतेवेळी नितीन पाटील घोगरे हर्षल काकड सदस्य ग्राम पंचायत कार्यालय खिरगव्हाण व युवासेना युवती पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.