महिला काँग्रेस कमिटी निरीक्षक पदी डॉकटर रेखाताई चव्हाण पाटील

हदगाव प्रतिनिधी / बालाजी पाटील
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस समितीच्या अध्यक्ष
संध्या सव्वालाखे यांनी डॉक्टर रेखा चव्हाण पाटील यांची निरीक्षक म्हणून निवड केली आहे त्यांच्याकडे पुणे शहर व ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड महिला काँग्रेस समितीचे निरक्षक पदाची धुरा देन्यातआली आहे काँग्रेसचे प्रदेशचे अध्यक्ष नाना पटोले माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या आदेशान्वये डॉक्टर रेखा ताई चव्हाण पाटील यांच्यावर सदर जबाबदारी देण्यात आली आहे रेखा चव्हाण पाटील यांच्याकडे सध्या महिला प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे तसेच त्यांनी यापूर्वी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून उत्कृष्ट कार्य केले आहे आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सदर निवड महत्वपूर्ण मानली जात आहे पक्षाने दिलेली जबाबदारी पुर्नपने पार पाडू अशी प्रतिक्रिया डॉक्टर रेखाताई चव्हाण पाटील यांनी दिली आहे