सामाजिक

संविधान प्रचारकांचा यलगार महाराष्ट्रातील युवक युवती घडवणार देशाचं भवितव्य

Spread the love

अरविंद वानखडे
यवतमाळ –
भारतीय संविधानिक मूल्यावर विश्वास ठेवणाऱ्या युवकांनी एकत्र येऊन आजच्या प्रश्नावर सकलj चर्चा करून त्या आधारित मागण्यासाठी युवकांनी जाहीरनाम्याची तयारी केली .असून संविधानाच्या ७५ वर्षात संविधानिक मूल्यांची अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने जाहीरनाम्याची ची रचना करण्यात आली आहे. याची माहिती देण्याकरिता स्थानिक विश्रामगृह येथे बीएसडब्ल्यू कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पत्रकार परिषद घेऊन हा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
आपल्या देशातील सर्व राजकीय न्यायालयीन व प्रशासकीय व्यवस्था ही संविधानिक तत्त्वावरती चालवत आणि त्या गाव पातळी सुद्धा चालाव्यात या लोकतांत्रिक प्रणालीवर कोणत्याही व्यावसायिक,धार्मिक व भांडवलशाही गटाचा प्रभाव नसावा.
मात्र सध्याच्या काळात काही ठिकाणी सरकारच्या हुकूमशाहीला घाबरून लोकशाही संपली अशी निराशा जनक वक्तव्य केल्या जात आहे. किसान आंदोलन,बेरोजगारी, गुणवत्तापूर्ण शिक्षण, जाती आधारित दलित, आदिवासी, मुस्लिम, ओबीसी यांचे शोषण महिला सुरक्षितता, आरोग्य खाणे पिणे शेती, पाणी,आरक्षण स्कॉलरशिप या वरती निबंध लावण्यात आल्याने या घटना संविधानाच्या विरोधात असल्याची खंत यावेळी युवकांनी मुद्दे पुढे आणले.
त्यामुळे महाराष्ट्रातील युवकांनी आपल्या वास्तव प्रश्न संबंधी मुद्दे चर्चेतून समजून घेऊन हा जाहीरनामा तयार केल्याचे त्यांनी सांगितले येत्या निवडणुकीच्या काळात हा जाहीरनामा सर्व राजकीय पक्षांना जाहीरपणे देण्याचे त्यांनी ठरविले आहे.
राष्ट्रीय युवादिन या दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्रभर अशा पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी यवतमाळ गटाचे युवकांनी एक स्लोगन तयार करून सांगितले की ‘अगर सडके खामोश हो जाये तो संसद आवारा हो जायेंगी’त्यामुळे ढासळत्या लोकशाहीला मजबूत करण्यासाठी युवकांनी पुढे यावे.की बहुधा आज आपल्या व्यवस्थेला प्रश्न विचारायला जमत नसल्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावले की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
आजचा युवक अस्वस्थ असून स्थानिक समस्या वरती सरकारचे लक्ष नसून भावनिक मुद्द्यांवरती हात घातल्या जात आहे. शेतकरी आत्महत्या, युवकांची बेरोजगारी, वाढती महागाई या विषयांना मागे टाकून धार्मिक विषमता वाढविल्या जात आहे. लोकशाहीच्या पडद्यामागे हुकूमशाही चालू असल्याचे सुद्धा यावेळी त्यांनी सांगितले.
शैक्षणिक धोरणामध्ये खाजगीकरण याचे धोरण बंद करून सर्व शिक्षण मोफत देण्यात यावे शेतकऱ्यांच्या मालांणा भाव देण्यात यावा महिलांना खरंच स्वातंत्र्य मिळाला का ? असा प्रश्न तेजस्विनी भोयर यांनी यावेळेस केला. यावेळी अनंत रमखाम, विकास शेंडे राजदीप कांबळे स्वाती भगत आशिष वाघमारे राधा देशमुख संकेत सरोदे इत्यादी विद्यार्थ्यां उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close