क्राइम

मुलीनेच केली आईची हत्या ;  3 महिन्यांनी झाला हत्येचा उलगडा

Spread the love

मुलीला अटक , हत्येत आणखी लोकांचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय

दुर्गंधि लपविण्यासाठी केला परफ्युम आणि रुम फ्रेशनर चा उपयोग 

घराशेजारील नाल्यातही सापडले मांसाचे तुकडे

मुंबई  / विशेष प्रतिनिधी

             लालबागेतील इब्राहिम कासीम चाळीत राहणाऱ्या विना जैन यांची हत्या तिच्याच मुलीने (रिपल) ने केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. हत्येचा उलगडा 3 महिन्यानंतर झाला आहे. रिपलने आईची हत्या करून मृतदेहाचे तुकडे घरात वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवले होते. घराशेजारील नाल्यात तुकडे फेकून सबुत लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणात एका पेक्षा जास्त व्यक्ती असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यांनी त्या दिशेने तपास सुरूनकेला आहे.

शेजाऱ्यांसह नातेवाईक जेव्हा याबाबत तिला विचारणा करत असत तेव्हा रिंपल दिशाभूल करणारी उत्तरे द्यायची. रिंपलच्या घरी नातेवाईक गेले तेव्हा त्यांना घरात तीव्र दुर्गंधी पसरल्याचं जाणवलं. यानंतर वीना जैन यांच्या हत्येचा उलगडा झाला. पोलिसांनी रिंपलच्या घरातून मृतदेहाचे तुकडे ताब्यात घेतले. तर काही तुकडे घराजवळ असणाऱ्या नाल्यातही आढळले आहेत. तिने बाथरूममधून मृतदेहाचे तुकडे बाहेर टाकण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.  आईची हत्या केल्यानतंर दुसऱ्या दिवशी मृतदेहाचे तुकडे रिंपलने बाथरूममधून बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी घरात काही ठिकाणी डागही पडले.

तसंच बाथरूम ब्लॉक झालं होतं. ते स्वच्छ करण्यासाठी रिंपलने प्रियकराला सक्शन कप आणण्यास सांगितलं होतं. रिंपलचा प्रियकर लालबाग परिसरातल एका हॉटेलमध्ये काम करतो. घरी खोके आणि हातमोजेही सापडले आहेत.

आता या प्रकरणामध्ये आणखी काही जण असल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी पोलिसांकडून परिसरात काही जणांची चौकशीही केली जात आहे. तसंच दोन संशयितांचा शोध घेण्यासाठी उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालला पथके रवाना झाली आहेत. हत्या केल्यानंतर २८ नोव्हेंबर रोजी रिंपलचा प्रियकर तिच्या घरी गेला होता.

तेव्हा त्याला दुर्गंधी वास आला. त्यावेळी रिंपलने बाथरूम तुंबल्यानं वास येतोय, तू सक्शन कप आणि दोन बाटल्या परफ्यूम, रूम फ्रेशनर आण असं त्याला सांगितलं. प्रियकराने तिला मदत केली. त्यानंतर रिंपलने परफ्यूम आणि रूम फ्रेशनर्सचा वापर दुर्गंधी लपवण्यासाठी सुरू केला. तिने मृतदेहाचे लहान तुकडे बाथरूममधून फ्लश करायला सुरुवात केल्याचा संशय पोलिसांना आहे. गेल्या तीन महिन्यात रिंपलने अंघोळही केली नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close