सारडा महाविद्यालयातील औषधी वनस्पती उद्यानास विद्यानिकेतन फार्मसी कालेज च्या विद्यार्थ्यांची भेट
– उद्यानामध्ये जवळपास 80औषधी वनस्पतींची लागवड व संवर्धन-
अंजनगाव सुर्जी :-(मनोहर मुरकुटे )
– स्थानिक श्रीमती राधाबाई सारडा कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने औषधी वनस्पती उद्यान तयार करण्यात आले आहे. सर्व लोकांपर्यंत औषधी वनस्पतींची माहिती पोहोचावी, त्याची ओळख व्हावी व त्याचे योग्यरीत्या संवर्धन व्हावे या उद्देशाने हे उद्यान तयार करण्यात आले आहे. या उद्यानाला अंजनगाव परिसरातील विद्यानिकेतन फार्मसी कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी औषधी वनस्पतीची ओळख, उपयोग व गुणधर्म जाणुन घेण्याकरिता 75 विद्यार्थ्यानी 5 शिक्षकांसह भेट दिली. वनस्पतिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मंगेश डगवाल यांनी उद्यानामध्ये असलेली औषधी वनस्पती याची ओळख व उपयोगा बद्दलची माहिती दिली. उद्यानातील औषधी वनस्पती अक्कलकाढा , इन्सुलिन प्लांट, समुद्रशोक,अडुळसा,शतावरी, गुळवेल ,गोकर्ण ,शतावरी अडुळसा , कोरांटी, काळमेध, गुंज, हेटा, पिंपरी व इतर औषधी वनस्पतींचे वेगवेगळ्या आजारावर काय उपयोग आहे हे सांगितले. श्री सारडा एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. अमर सारडा, संस्थेचे सर्व पदाधिकारी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वशिष्ठ चौबे याच्या मार्गदर्शनात सदर उद्यान तयार करण्यात करण्यात आले असून या मध्ये डॉ. मंगेश डगवाल यांनी विविध ठिकाणावरून औषधी वनस्पती गोळा करून त्याचे संवर्धन केले आहे. उद्यानामध्ये विद्यार्थी औषधी वनस्पती रोपटे बनविण्याचे प्रशिक्षण घेतात व ती रोपटे परिसरातील लोकांना भेट म्हणून दिल्या जाते. अंजनगाव तालुक्यातील लोकांनी उद्यानास भेट देऊन त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. वशिष्ठ चौबे व विभाग प्रमुख वनस्पतीशास्त्र विभाग डॉ. मंगेश डगवाल यांनी केले आहे.