Uncategorized

अंजनगावात शिवसेनेची शिवजयंती मिरवणूक जल्लोषात

शिवसेनेच्या आयोजनाला भाजप चा मोठा प्रतिसाद

Spread the love

अंजनगावसुर्जी प्रतिनिधी / मनोहर मुरकुटे

संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेची गटबाजी झाल्यानंतर शिंदे गटाला शिवसेनेचे नाव व चिन्ह मिळाल्यानंतर उत्साह संचारलेल्या शिवसेनेच्या(शिंदे गट) वतीने शहरात प्रथमच तिथी नुसार येणारी शिवजयंती साजरी करण्यात आली शहर प्रमुख मुन्ना इसोकार यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला शहरातील शिवसेना शिंदे गटाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भाजप च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह दिसून आला या निमित्ताने नव्या शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन शहर वासियांना पहायला मिळाले
****** शहरातील लेंधे मार्केट जवळून अत्याधुनिक साऊंड सिस्टीम असलेल्या डिजे च्या निनादात शिवसेना __ शिवसेना__ शिवसेना__ या गीताच्या तालावर युवकांनी धरलेला ताल मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले होते शहरातील सराफा बाजार, चावळी चौक,शनिवारापेठ, पानअटाई मार्गे विठ्ल मंदिरात समारोप करण्यात आलेल्या मिरवणुकीतील शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे ठीक ठिकाणी पूजन करण्यात आले मिरवणुकीत माजी आमदार रमेश बुंदीले, माजी नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे,डॉ विलास कविटकर, भाजप महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष शुभांगी पाटणकर,
मनोहर मुरकुटे ,मनीष मेण,सचिन जायदे,मधुकर गुजर,रवींद्र बोडखे,संजय नाठे,विकास रावळे,रवी गोळे, शिवसेना शहर प्रमुख मुन्ना इसोकार , उपजिल्हा प्रमुख नंदकिशोर जांभुळकर,विधानसभा संघटक भांडे ,तालुका प्रमुख निवृत्ती बारब्दे ,युवासेना शहर प्रमुख विश्वजीत रायलकर, उपशहर प्रमुख देविदास नेमाडे,उपशहर प्रमुख संतोष धर्मे,ज्वाला रेखाते,शहर संघटक नरेश तायडे,उपशहर संघटक प्रकाश अस्वार,युवासेना तालुका प्रमुख स्वप्निल लहाने ,निरज नागे,महिला शहर प्रमुख पुजा वासनकर
,अल्पसंख्याक शहरप्रमुख रमीज राजा समीर खान, सोशल मिडीया प्रमुख अक्षय बोरकर, शाखा प्रमुख आदेश चोरे,गजानन काळे ,विकास रावळे,अक्षय लांडे,दिनेश कोरडे,,शशीर माहुलकर,संतोष टिंगणे,ज्ञानेशवर माकोडे, शाखा प्रमुख पवण प्रजापती, सचिन दातिर व सर्व शाखा प्रमुख,उपशाखा प्रमुख,शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Sumit Baniya

Related Articles

Back to top button
Close
Close