सामाजिक

नेर तालुका युवक काँग्रेस वतीने शासनाचा निषेध

भाजपाच्या हुकूमशाहीच्या विरोधात युवक काँग्रेस आवाज उठवणार, राहुल गांधीची खासदारकी रद्द करणे म्हणजे लोकशाहीच्या खूनच

Spread the love

नेर प्रतिनिधी / नवनाथ दरोई

सुरतच्या सत्र न्यायालयाने काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांना एका प्रकरणात शिक्षा ठोठावल्यावर चोवीस तासाच्या आत लोकसभा सचिवालयाकडून यांचे खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा निषेध म्हणून नेर तालूका युवक काँग्रेसच्या वतिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्रित जमा होऊन काॅग्रेस युवकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून, शासनाच्या विरोधात नारेबाजी करून निषेध करण्यात आला.यावेळी अनेक युवकांनी आपापली भुमिका माडली.यावेळी सतिश चवात असे म्हणाले की, सदृढ लोकशाही मध्ये विरुद्ध पक्ष असणे आवश्यक आहे. मात्र गेल्या नऊ वर्षात मोदीच्या काळात जे जनतेचे प्रश्न घेऊन आवाज उठवतात त्यांच्या मागे ईडी, सीबीआय यांच्या चोकशा लाऊन त्यांना तुरुंगात डाबतात.अनेक प्रकरण आवश्यक पुरावे दाखल न केल्याने न्यायालयाने ईडी व सिबिआय यांच्यावर ताशेरे ओढले आहे. खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो अभियानानंतर देशातील जनता काॅग्रेसमागे उभी राहत आहे. व भाजप सरकारच्या विरोधात जनमत तयार होत आहे. त्यामुळे भाजपचे नेते राहुल गांधी यांना कुठेतरी अडकविण्याच्या प्रयत्न्नात होतेच व अनासे त्यांना संधी मिळाली. वास्तविक न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यावर त्यांना शिक्षेच्या विरोधात न्यायालयात कायदेशीर दाद मागण्यांचा कायेदेशिर अधिकार असतानाही भाजपच्या नेत्यांनी जरा हि धिर न धरता त्यांनी त्वरित हालचाली करून त्यांचे खासदारकी रद्द केली. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करून भाजपाच्या विरोधात आवाज उठविणाऱ्यामध्ये दहशत निर्माण करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. पण काँग्रेस कार्यकर्ते पुन्हा जोमाने भाजपाच्या हुकूमशाहीच्या विरोधात आवाज उठवतील, व यात देशातील जनता ही सहभागी आहे असे मत येथील युवकांनी व्यक्त केले. यावेळी अजिंक्य मासाळ,दिवाकर इंगोले, शुभम मेहरे,बासित खान,बापूराव रंगारी,रत्न्ना मिसळे,सागर तिमाने,गणेश आप्पा झाडे,पियुष अजमिरे,किशोर अडसोड, शारिक हूसेन,राहूल खडसे,स्वपन्नील ढोमने,पवन कसाटे, अभिलेश भोयर,शोएब खान, रामकिशोर इंगळे व अन्य काॅग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Sumit Baniya

Related Articles

Back to top button
Close
Close