राजकिय

प्रियांक खरगे यांच्या सावरकर विरोधी वक्तव्यावर निषेध नोंदवत भाजपा चे आंदोलन

Spread the love

दर्यापूर / प्रतिनिधी

काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष मालिक्कार्जुन खरगे यांचा मुलगा प्रियांक खरगे यांनी  सावरकर यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ आज दर्यापूर येथे भाजपा आणि भाजपा युवा मोर्चा यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण महाराष्ट्रभर भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येत आहे.

त्या अनुषंघणे आज 8 डिसेंबर रोजी जयस्तंभ चौक दर्यापूर येथे अमरावती जिल्हा उपाध्यक्ष बाबाराव पाटील बरवट यांच्या नेतृत्व मध्ये आंदोलन कारण्यात आले, सदर निषेधार्थ आंदोलनात “सावरकर का अपमान नहीं सहेंगे नहीं सहेंगे ” प्रियांग खरगे मुर्दाबाद मुर्दाबाद “अशे विविध नारे देण्यात आले, त्या प्रसंगी जिल्हा सरचिटणीस विलासजी कविटकर,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अजिंक्य वानखडे, विधानसभा प्रमुख गोपालजी चंदन , समीर हावरे, मदन पाटील बायस्कार,रमेशजी बुंदीले, रवींद्र ढोकने, राजेंद्र कोंडे, रवी गोळे, उमेश भोंडे, रवी राजपूत,संतोष काळे,मनीष मेन, माणिकराव मानकर, विजयराव मेंढे, राम ठाकरे, गौरव चांदुरकर, सागर लाजूरकर, सौरव काळमेघ, प्रफुल लोडम, नकुल सोनटक्के, मेघाताई भारती, अपर्णाताई मुळे, सुषमाताई पाचडे व इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close