१८ वर्षीय मुलीची मागील चार वर्षात ६४ लोकांनी लुटली अब्रू
केरळ / नवप्रहार ब्युरो
एका १८ वर्षाच्या मुलीने शाळेत कौंसलिंग च्या वेळेस जो खुलासा केला तो अत्यंत धक्कादायक आणि हादरवणारा होता. तिने सांगितले की मागील चार वर्षांत तिच्यावर ६४ लोकांनी बलात्कार केला आहे.हा किळसवाणा प्रकार ती १३-१४ वर्षाची असतांना सुरू झाल्याचे तिचे म्हणणे आहे.
मुलीने नुकताच तिचा १८ वा वाढदिवस साजरा केलाय. ती १३-१४ वर्षांची असल्यापासून तिच्यावर अत्याचार केले गेले. चार वर्षात ६४ जणांनी अत्याचार केल्याचं तिने म्हटलं असून यात जवळच्या अनेकांचा समावेश आहे. शाळेत शिकणारी मुलं, तिचे प्रशिक्षक, शेजारी आणि नातेवाईकांची नावं तिनं आरोपी म्हणून घेतली आहेत.
पथानामथिट्टा जिल्ह्यात एका मुलीने शाळेत काउन्सिलिंगवेळी जे सांगितलं त्यामुळे सगळेच हादरले आहेत. चार वर्षात ६४ जणांकडून लैंगिक शोषण केलं गेलं. पोलिसांनी सांगितलं की, या प्रकरणी पाच संशयित आरोपींना अटक करण्यात आलीय. तर सहावा आरोपी आधीपासूनच तुरुंगात आहे.
पहिल्यांदा २०१९ मध्ये तिचं लैंगिक शोषण झालं होतं. त्यावेळी ती फक्त १३ वर्षांची होती. शाळेत शिकणाऱ्या मित्रानेच अत्याचार केले होते. त्यानंतर त्याने त्याच्या मित्रांना बोलावूनही त्यांनीही अत्याचार केले. मुलगी स्पोर्ट्सपरसन असून इतर सहकाऱ्यांनी लैंगिक शोषण केलं. प्रशिक्षक आणि ट्रेनरनेसुद्धा अत्याचार केले आणि नातेवाईकांनीही छळ केल्याचा आरोप मुलीने केलाय.
पथानामथिट्टा जिल्हा पोलीस प्रमुख या प्रकरणाची चौकशी करत आहेत. मुलीकडे तिचा मोबाईल नाही. ती वडिलांचाच फोन वापरत होती. या फोनवर अत्याचार करणाऱ्या तब्बल ४० जणांचे फोन नंबर सेव्ह होते अशीही माहिती समोर आलीय.
बाल कल्याण समितीच्या सदस्यांनी सांगितले की, मुलीने जे सांगितलं ते धक्कादायक आहे. तिचे मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन केले जाणार आहे. यामुळे तिच्या आरोपीताल तथ्य शोधण्यासाठी मदत होईल. हे खूपच भयंकर असून या प्रकरणी पोलीस अधीक्षकांना माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकरणाचा तपास होणार आहे.