लफडेल बायकोने पतीचा असा काढला काटा

बाराबाकी / नवप्रहार न्यूज नेटवर्क
हजरतपुर गावातील तलावा च्या काठावर आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. लफडेल बायकोचे कारनामे नवऱ्याने पकडल्याने बायकोने कट रचून नवऱ्याला यमसदनी धाडले आहे. पोलिसांनी योग्य रित्या तपास करत बायको आणि तीच्या प्रियकराला अटक केली आहे.
हजरतपुर गावातील तलावाच्या काठावर मृतदेह आढळला होता. चेहऱ्यावर, शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या. हे किळसवाणं दृश्य पाहताच गावकऱ्यांनी किंचाळ्या फोडल्या. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर एक भयानक थरार उघडकीस आला. उत्तरप्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यातील हजरपतपूरमध्ये ही घटना घडली. तलावाकिनारी आढळलेल्या मृतदेहाची कैलास अशी ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पहिला संशय त्याच्या पत्नीवर आला. पोलिसांनी सर्वातआधी तिला ताब्यात घेतलं.
चौकशीत तिने उलटसुलट उत्तरं दिली. पोलिसांना भरकटवायचा प्रयत्न केला. मात्र अखेर पोलिसांनी तिच्या मुसक्या आवळल्या. विवाहबाह्य संबंधांतून तिने नवऱ्याचा खून केल्याचं उघडकीस आलं. तिच्या प्रियकरानेही या गुन्ह्यात तिची साथ दिली होती. या दोघांनाही पोलिसांनी तुरुंगात धाडलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कैलासचा मावस भाऊ श्रवण याच्यासोबत त्याची पत्नी रेणू हिचे विवाहबाह्य संबंध होते. दोघांना नको त्या अवस्थेत त्याने पाहिलं होतं आणि त्यावरून पत्नीला बेदम मारलं होतं.
त्यानंतर श्रवण सौदी अरेबियाला निघून गेला. त्याच्या जाण्याने रेणू प्रमाणापेक्षा जास्त दुःखी झाली होती. त्यामुळे तिच्याबद्दलचा कैलासच्या मनातला संशय प्रचंड बळावला होता. त्यातच श्रवण गेल्यानंतर एका शाळेत शिपायाचं काम करणाऱ्या रामकुमार नामक व्यक्तीसोबतही रेणूचे प्रेमसंबंध जुळले.
याबाबत कैलासला कळताच तिने त्याच्या हत्येचा कट रचला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणूने 17 जूनला आपल्या मुलांची शाळेची फी कमी करण्याच्या बहाण्याने कैलासला रामकुमारला भेटायला सांगितलं. कारण रामकुमार शाळेचा शिपाई होता. कैलास त्याला भेटण्यासाठी बदोसरायला पोहोचताच कोल्ड ड्रिंकमध्ये बेशुद्ध होण्याच्या गोळ्या मिसळून त्याला बेशुद्ध करण्यात आलं आणि गाडीत भरलं. रामकुमार आणि रेणूने गाडीतच त्याचा गळा कापडाने आवडला आणि पान्याने त्याच्या गळ्यावर सपासप वार केले. या संपूर्ण घटनेचा पर्दाफाश झाल्यानंतर पोलिसांनी दोन्ही गुन्हेगारांना अटक केली आहे.