हटके

हॉटेल मध्ये मित्रासोबत गेलेली तरुणी किंचाळत रुम बाहेर पडली

Spread the love

नागपूर / नवप्रहार मिडिया

               मित्रासोबत हॉटेल मध्ये गेलेली तरुणी किंचाळत हॉटेल च्या रुम च्या बाहेर पडली. तिची किंचाळी ऐकून हॉटेल कॅग्या कर्मचाऱ्यांनी रुम कडे धाव घेतली. आतील दृश्य पाहून ते देखील काही वेळेसाठी रुम च्या बाहेरच थबकले. रामटेक तालुक्यातील नगरधन येथे ही घटना घडली आहे.

 जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील नगरधन येथे ही घटना घडली आहे. मुकेश भोंडेकर (वय २२) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मनसर येथे वास्तव्यास होता. मुकेश हा मैत्रीनी सोबत नगरधन येथील एका हॉटेलमध्ये गेला होता. दोघेजण हॉटेलमध्ये गेल्यानंतर सोबत असलेली तरुणी ही बाथरूममध्ये गेली होती. यानंतर रूममध्ये एकटाच असल्याने मुकेशने ओढणीने गळफास लावत आत्महत्या केली.

तरुणी बाथरूम मधून बाहेर आल्यानंतर मुकेशने गळफास घेतल्याचे दिसले. हे दृष्य पाहून घाबरलेली तरुणी रूममधून धावत बाहेर आली व घटनेबाबत हॉटेल मॅनेजरला सांगितलं. घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस (Police) आल्यावर मुकेशला खाली उतरवत तात्काळ खाजगी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती पोलिसांना मिळतात पोलीस सगळ्या प्रकरणांमध्ये मुलीकडून घटनाक्रम जाणून घेतला. दरम्यान आत्महत्येचे कारण स्पष्ट झालं नसून नेमकं काय घडलं; याचा खुलासा शवविच्छेदन अहवालानंतर होईल. त्याशिवाय पोलिसही या सगळ्या प्रकरणात आत्महत्येच्या कारणाचा शोध घेत आहे.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close