ब्रेकिंग न्यूज

खासदार सुनील मेंढे यांच्या वाहनाला अपघात

Spread the love
ट्रेलर ने दिली  धडक  ; वैनगंगा नदीच्या मोठ्या पुलावरील घटना
भंडारा / राजू आगलावे
               भंडारा- गोंदिया जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे यांच्या वाहनाला ट्रेलर ने वैनगंगा नदीवरील मोठ्या  पुलावर धडक दिल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. सुदैवाने गाडीला फक्त खरचटले.यावेळी खासदार त्यांच्या ताफ्यातील  दुसऱ्या गाडीत असल्याचे समजते.
                सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार भंडारा – गोंदिया मतदार संघाचे खासदार सुनील मेंढे हे मोरगाव अर्जुनी येथे दिंव्यांग बांधवांना  देण्यात येणाऱ्या ‘ट्रायसिकल ‘  वाटपाच्या  कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात  होते. दरम्यान भंडारा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र.53 वरील  वैनगंगा नदीच्या मोठ्या पुलावर त्यांच्या वाहनाला  ट्रेलर ने धडक दिली. त्यात त्यांच्या खाजगी वाहनाला उजव्या बाजूच्या दाराला खरचटल्याने वाहनाचे नुकसान झाले.
खासदार स्वतःच्या गाडीत नव्हते – यावेळी खासदार सुनील  मेंढे हे स्वतःच्या गाडीत नसल्याचे कळते. ते त्यांच्या दौऱ्याच्या ताफ्यातील अन्य वाहनात बसले होते. ज्या गाडीचा अपघात झाला त्यात खा. मेंढे यांचे अंगरक्षक आणि अन्य दोन व्यक्ती आणि चालक बसून होते.
असा झाला अपघात – सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार या रस्त्यावर धावणाऱ्या दोन ट्रेलर चालकांत कुठल्या तरी गोष्टीवरून वाद झाला होता. त्यात ते ऐकमेकांना शिव्या हासडत होते. पहिल्या ट्रेलर ला ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रेलर चालकाचे संतुलन बिघडल्याने त्याची खासदार मेंढे यांच्या इनोव्हा कार क्र. एम एच 36 / झेड -7770 च्या उजव्या बाजूच्या मागच्या दाराला डॅश लागली.
चाहत्यांनी मानले परमेश्वराचे आभार – सुदैवाने यात कुठलिही जीवित हानी झाली नसल्याने त्यांच्या चाहत्यांनी परमेश्वराचे आभार मानले आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close