पुन्हा एकदा पुणेरी पाटी चर्चेत
पुणे / विशेष प्रतिनिधी
पुणे तिथे काय उणे असं उगीच म्हटल्या जात नाही. येथे असे अकल्पनिय लोक राहतात जे आपल्या कल्पकतेने आणि विचाराने लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालून त्यांचे डोळे उघडतात. येथील पाट्या या लोकांचे नेहमीच लाख वेधून घेतात. सध्या अशीच एक पुणेरी पाटी चांगलीच चर्चेत आहे. चला तर पाहू या नेमके काय लिहले आहे या पाटीवर.
बिना व्यक्त होता आपली मतं ठामपणे आणि थेट मांडण्याचं पुणेकरांच माध्यम म्हणजे पुणेरी पाटी. पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. अशाच एका पुणेरी पाटीवर यावेळी प्रेमी युगुलांसाठी सुचना लिहली आहे. सूचना नाही तर थेट इशाराच दिला आहे म्हणा. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. अशाच एका पुणेरी पाटीची चर्चा सध्या सगळीकडे जोरात सुरू आहे. ही पाटी पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.
पाटी वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही. आता तुम्ही म्हणाल असं लिहिलंय तरी काय? तर, अनेकदा सार्वजनिक ठिकाणी काही जोडपे अश्लील चाळे करतात. अशा जोडप्यांना ताकीद देणारी सूचना या पुणेरी पाटीवर लिहिली आहे. या पाटीवर “मुला मुलींना( प्रेमी युगुलांना) इशारा गावंदेवी मंदिराच्या परिसरात वेडी वाकडी (अश्लील) चाळे केल्यास पोकळ बांबुचे (फटके) देण्यात येतील.” अनेकदा सार्वजनिक ठिकाणी काही जोडपी अश्लील चाळे करतात. त्याबद्दलचा राग जोडप्यांना ताकीद देत या पाटीद्वारे व्यक्त केलाय.
हा फोटो editor_sonu_xx नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर नेटकरीही वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिले, “पुणे तिथे काय उणे.” दुसऱ्याने लिहिले, “भावा, एक नंबर.”
पुणेरी पाट्या म्हणजे पुणेकरांसाठी अभिमानाचा वारसा
‘तुम्हाला प्रत्येक विषयात स्वत:चे मत नसेल तर येथे प्रवेश नाही’, अशा इशार्यापासून ते ‘पगडीखालची खरी बुद्धिमत्ता काय असते हे पाहायचंय?’ असे आव्हान फक्त एकाच शहरात दिले जाऊ शकते, ते म्हणजे पुणे. सुरुवातीला पेठांमध्येच असलेली पुणेरी पाटी शहर पसरले तशी संपूर्ण पुण्यात पसरली. कमीत कमी शब्दांत समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची कला पुणेकरांनाच साधली आहे असे म्हणतात. त्याचप्रमाणे कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त खवचट आशय व्यक्त करणारी पुणेरी पाटीही कोणी येरा गबाळा बनवू शकत नाही. पुणेरी पाट्या म्हणजे पुणेकरांसाठी अभिमानाचा वारसा. केवळ बुद्धिमत्ता नाही तर खास पुणेरी बुद्धीतून पाट्यांच्या माध्यमातून पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा आणि थेट भिडण्याची वृत्ती झळकते.