शाळेत गेलेली तीन मुले अचानक गायब ;समोर आले हे कारण
कल्याण / नवप्रहार मीडिया
सकाळी शाळेत जाण्यासाठी घरून निघालेली तीन मुले अचानक शाळेच्या गेट वरून गायब झाली. संधगकाळ होऊन देखील ती घरीन परतंल्याने वडिलांनी शोध घेतला. आणि पोलिसात धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून मुलांच्या शोध घेण्यासाठी पथक नेमण्यात आले. त्यांनी असे शोधले मुलांना.
कल्याण रामबाग परिसरात विजय तोंबर हे वास्तव्यास आहेत. त्यांना चार मुले आहेत. यापैकी त्यांची तीन मुलं कल्याण पश्चिम येथील जोशीबाग स्कूलमध्ये शिकतात. ही मुलं बुधवारी दुपारी शाळेत गेली. शाळेच्या गेटवर या तिघांना त्यांचे शिक्षक भेटले. पण ही मुलं अचानाक बेपत्ता झाली. सायंकाळी उशिरापर्यंत ही मुलं घरी न परतल्याने विजय तुंबर यांनी याविषयी कल्याण महात्मा फुले पोलिसांना माहिती देत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी मुलांचा शोध कसा लावला?
विजय तुंबर यांची तक्रार मिळताच कल्याण झोन तीनचे डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याण घेटे, पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक होनमाने आणि पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयात करण्यात आलं. या पथकाने परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली. याच दरम्यान त्यांना कल्याण रेल्वे स्टेशनवरून ही तीन मुलं आसनगावच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रेनमध्ये जाताना दिसली. त्यानंतर या पथकाने सर्वच स्टेशनचे सीसीटीव्ही तपासणी केली.
या दरम्यान ही तीनही मुलं खडवली रेल्वे स्थानकावर उतरताना दिसले. या मुलांच्या शोधासाठी पोलीस पथक खडवली रेल्वे स्थानकावर पोहोचले. यावेळी पोलिसांनी मुलं रेल्वे स्थानकावर भेटले. पोलिसांनी या तिघांना विचारले असता हे तीनही मुलं शाळेच्या नावाने खडवली नदीत आंघोळीसाठी आले, अशी कबुली त्यांनी दिली. घरी परतत असताना रात्री रस्ता चुकल्याने ही तीनही मुलं शहरात भटकत होती. पोलिसांनी या मुलांचा वेळेवर शोध घेतल्याने सुदैवाने त्यांना कोणतीही जीवीतहानी झाली नाही. पोलिसांनी तीनही मुलांना कुटुंबियांच्या स्वाधीन केलं आहे.