हटके

रेप ऑन फीमेल डॉग इमारतीतील रहिवाशी शॉक

Spread the love

रहिवाश्यांनी आरडाओरड केल्यावर तिला तिसऱ्या माळ्यावरून फेकले

महिलेने केली पोलिसात तक्रार

नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया 

              राजधानी दिल्लीच्या ग्रेटर नोएडा अल्फा टु मध्ये एका माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.येथे राहणाऱ्या एका प्रॉपर्टी डीलर ला कुत्री सोबत अनैसर्गिक कृत्य करताना रहिवश्यांनी पाहिल्याने आणि त्याच्या विरोधात तक्रार दाखल केल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. रहिवाश्यांनी त्याला हे कृत्य करतांना पाहिल्याने त्याने कुत्रीला तिसऱ्या मजल्यावरून फेकून दिले .

उंचावरून फेकल्याने कुत्री जखमी झाली आहे. या घटनेनंतर सोसायटीमधील रहिवाशांनी आरोपीविरोधात पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

सेक्टर अल्फा टू येथे राहणाऱ्या एका महिलेने पोलिसांना तक्रार करताना सांगितले की, ही घटना २५ ऑक्टोबरच्या रात्री सुमारे १२.०० वाजता घडली. त्यांनी सांगितले की, सोनवीर हा त्यांच्या शेजारी भाड्याच्या घरामध्ये राहतो. आरोपी सोनवीर याने गल्लीतील कुत्रीवर या इसमाने अनैसर्गिक अत्याचार केला. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.

तक्रार करणाऱ्या महिलेने सांगितले की, सोनवीर गल्लीमधील एका कुत्रीला त्याच्या घरातील बाल्कनीमध्ये घेऊन आला. तिथे त्याने या कुत्रीसोबत अनैसर्गित कृत्य केले. ही बाब शेराजी राहणाऱ्या अशोक वर्मा यांनी पाहिली. त्यांनी आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर गडबडलेल्या आरोपीने या कुत्रीला तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकले.

दरम्यान, महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी प्रॉपर्टी डिलरविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस आरोपीच्या घरी आले तेव्हा तो फरार झाला होता. या प्रकरणाची माहिती मिळताच शहरातील पशुप्रेमींनी आरोपीला कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close
Click to Join Our Group