लाडकी बहीण योजना मधील जातक नियम शितील करा- आशु गोंडाने
लाडकी बहीण योजना मधे लागणारा अधिवास दाखला साठी जन्म दाखल्याची ची अठ रद्द करू टी सी आधारे अधिवास ( डोमीसाईल )दाखला देण्यात यावा….
भंडारा / हंसराज
महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.महाराष्ट्राच्या रहिवासी असलेल्या वय वर्ष २१ ते ६० पर्यतच्या महिलांसाठी दरमहा १५०० रुपये अनुदान मिळणार आहे .
या योजनेमध्ये दिलेली मुद्दत दिनांक ०१ जुलै ते १५ जुलै २०२४ अशी देण्यात आली आहे.आपला भंडारा जिल्हा हा शेती प्रधान असल्यामुळे गावा-गावा मध्ये धान पेरणीचे काम सुरू आहे.तसेच मुलांना शाळेमध्ये दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे यामुळे एवढ्या कमी वेळात पात्र लाभार्थींना अर्ज ऑनलाईन भरणे कठीण आहे.सदर योजनेमध्ये जन्म दाखला असणे आवश्यक आहे तरी प्रत्येकाकडे जन्म दाखला राहत नसल्यामुळे टी.सी. (TC) आधारे डोमीसाईल तयार करण्यासाठीची व्यवस्था करण्यात यावी जेणेकरून पात्र लाभार्थींना यामध्ये अर्ज करणे सोयीस्कर होईल.या आशेचे निवेदन जिल्हा उपअधिकारी सौ स्मिता बेलपात्रे मॅडम देण्यात आले .या योजनेमध्ये लागणारे दाखले मिळविण्यास विलंब होत असल्यामुळे यात मुद्दत वाढ करण्यात यावी, ही विनंती करण्यात आली.
ह्या प्रसंगी आशु गोंडाने रब्बी जी चढ्ढा , सचिन कुंभलकर , शैलेश मेश्राम , भूपेश तलमले , नितीन तुमाने , ढोमने , निलेश रामटेके , राजेश टिचकुले , पपु खैरे व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते .