आई आणि मुलीचा एकच बॉयफ्रेंड

सत्य समजल्यावर आईच्या पायाखालची जमीन सरकली
नागपूर / विशेष प्रतिनिधी
नवऱ्याला दारूचे व्यसन असल्याने ती नवऱ्याच्या ड्रायव्हर मित्राच्या प्रेमात पडली. नवरा घरी नसला की तो घरी येऊ लागला. तो घरी येत असल्याने प्रेयसी च्या मुली देखील त्याला ओळखू लागल्या होत्या. दरम्यान मोठी मुलगी त्याच्या प्रेमात पडली त्याने तिची आई आणि तिच्या सोबत बनवलेले अश्लील व्हिडिओ व्हायरल केले. मुलीचे अश्लील व्हिडिओ इंस्टाग्राम वर व्हायरल झाल्याचे समजल्यावर महिलेने प्रियकराच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
नागपूरमध्ये जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जातो आहे. या घटनेनं नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे.
पती दारूच्या आहारी गेल्याने पत्नीचे एका ड्रायव्हरशी प्रेमसंबंध जुळले. त्यातून त्याचे घरी येणे जाणे सुरू झाले. मुलगी वयात येताच, तिचाही त्याच्यावर जीव जडला. याचाच फायदा घेत, त्याने तिच्याशी प्रेमाचे नाटक करीत आपल्या जाळ्यात ओढले. त्यातून आई आणि मुलीचे व्हिडिओ तयार करीत, चक्क ते व्हायरल केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला दोन मुलीसह जरीपटका परिसरात राहते. तिचे ड्रायव्हर असलेला ४२ वर्षीय व्यक्तीशी बारा वर्षांपूर्वी प्रेमसंबंध जुळले. त्यातून दोघेही एकमेंकांशी भेटायचे. अधूनमधून रमेश त्यांच्या घरीही यायचा. त्यावेळी मुली लहान असल्याने तो त्यांचेशीही बोलायचा.
मुली मोठ्या झाल्या. महिलेच्या मोठी मुलीचेही या व्यक्तीवर प्रेम जडले. याचाच फायदा घेत, त्यानेही तिच्याशीही लगट करण्यास सुरुवात केली. महिला घरी नसल्यावर तो घरी यायचा. याशिवाय तिच्याशी व्हिडिओ चॅट करीत, तिचे अश्लील व्हिडिओही बनवायचा. केवळ तिचेच नव्हे तर तिच्या आईचेही त्याने अनेक व्हिडिओ तयार केले होते. त्यातून त्याने त्यांच्यावर अनेकदा अत्याचारही केला.
काही दिवसांपूर्वी या व्यक्तीने मुलीचे व्हिडिओ इन्टाग्रामवर टाकल्याने मुलीसोबतच्या प्रेमाचे बिंग फुटले. महिलेला ही बाब कळताच, तिने याबाबत मुलीला विचारणा केली. मात्र, महिलेचे त्याच्याशी असलेल्या संबंधाची माहिती मुलीला झाल्याने तिने आईला प्रतिप्रश्न केला. त्यावर तिने मुलीच्या व्हिडिओवरून तो ब्लॅकमेल करीत असल्याची बतावणी केली. ही बाब लहान बहिणीलाही माहिती झाली. त्यावरून महिलेने जरीपटका पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची चौकशी करीत गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.