सामाजिक

मुख्यमंत्र्यांनी स्वतः अधिवेशनामध्ये ” सरसकट जुनी पेन्शनची” घोषणा करावी

Spread the love

 

आमचं ठरलंय शिर्डी मध्ये महाअधिवेशन होणार*

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेची मागणी

वर्धा / नवप्रहार प्रतिनिधी

सविस्तर असे की, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे भव्य असे महाअधिवेशन येणाऱ्या 15 सप्टेंबर 2024 रोजी नियोजित असून राज्यभरातून लाखोंच्या संख्येने राज्य सरकारी कर्मचारी या अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत राज्य कार्यकारिणीच्या सहविचार सभेत ठराव संमत झाल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे महाअधिवेशन होणार आहे.काल दि 15 ऑगस्ट रोजी झालेल्या राज्यकार्यकारिणीच्या ऑनलाईन मीटिंगमध्ये शिर्डी हे मध्यवर्ती ठिकाण सर्वानुमते ठरवण्यात आले. तत्पूर्वी सद्यपरिस्थितीमध्ये राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात जुन्या पेन्शनच्या प्रमुख मागणीसाठी विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण आंदोलने करण्यात आले आहेत व काही ठिकाणी सुरू आहेत त्यामध्ये छत्री आंदोलन,दंडवत आंदोलन, मुंडण आंदोलन यासारखे वैविध्यपूर्ण आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्यात आले.तसेच येणाऱ्या महा अधिवेशनात सर्व राज्यभरातून लाखोंच्या संख्येने कर्मचारी शिर्डी येथे एकवटणार असून पेन्शन मिळवल्याशिवाय जुनी पेन्शन संघटना शांत राहणार नाही असा निर्धार देखील यामध्ये करण्यात आला .संघटनेचे राज्याध्यक्ष श्री वितेश खांडेकर यांनी नुकत्याच संघटनेचे शिष्टमंडळ व मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान घडलेल्या घडामोडींचा आढावा सांगितला त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः पेन्शन या विषयावर सकारात्मक असल्याची ग्वाही दिली व हा विषय मीच हाती घेतला असून मी स्वतः सोडवेल असे आश्वासन संघटना पदाधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले. राज्यभर सध्या पेन्शनमय वातावरण असून तरुण कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन मिळवण्यासाठी एल्गार पुकारला आहे व येणाऱ्या 15 सप्टेंबर रोजी राज्यभरातून लाखो पेन्शन शिलेदार या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत असे राज्यसरचिटणीस गोविंद उगले यांनी सांगितले. सदर बैठकीमध्ये सर्व राज्यपदाधिकारी, सर्व विभागांचे अध्यक्ष तसेच सर्व विभागीय पदाधिकारीसर्व जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष यांची भूमिका समजावून घेण्यात आली पेन्शन मिळवण्यासाठी सर्व पदाधिकारी सक्रियपणे अधिवेशनाच्या तयारीसाठी कार्यरत असून अधिवेशन यशस्वी होईल यासाठी सर्वच संस्कारातून प्रयत्न होणार असल्याचे ग्वाही सर्व पदाधिकाऱ्यांनी दिली.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close