हटके

विदेशी महिलांचे व्हिडीओ बनवणारा युट्युबर आला अडचणीत

Spread the love

पणजी / विशेष प्रतिनिधी 

                 सध्या युट्युबर आणि ब्लॉगर्स चा बोलबाला आहे. व्ह्यूज मिळविण्यासाठी हे लोकं काही तरी नवीन करण्याच्या मनस्थितीत असतात. पण कधी कधी हा आगाऊपणा अंगलट येऊ शकतो. असाच प्रकार गोव्यात घडला आहे.

             गोव्यात आलेल्या परदेशी महिला पर्यटकांचे आक्षेपार्ह व्हिडिओ करुन त्रास देणारा युट्युबर अडचणीत सापडला आहे. याप्रकरणी सोशल मिडियावरुन व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गोवा पोलिसांनी याची दखल घेत तपास सुरु केला आहे. युट्युबर गोव्यातील विविध व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट केल्यानंतर नागरिकांनी तक्रार केली आहे.

 

 

याप्रकरणी हिंदुत्व नाईट या एक्स अकाऊंटवरुन एक व्हिडिओ आणि काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. हा व्यक्ती बांगलादेशी असून, तो गोव्यात आलेल्या परदेशी महिलांना त्रास देत असल्याचा आरोप या पोस्टमधून करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी योग्य कारवाई करावी, अशी मागणी देखील या पोस्टमधून करण्यात आला आहे.

मिजान खान असे या युट्युबरचे नाव आहे. मिजान Life Story vlog या नावाने  चालवतो. चॅनलवरती 652 व्हिडिओ प्रसिद्ध करण्याता आले असून, चॅनलला 761 फॉलोवर्स आहेत. यामध्ये सर्वाधिक गोव्यातील व्हिडिओ आहेत. अनेक व्हिडिओत गोव्यातील बीच आणि परदेशी पर्यटक दाखवून त्यांच्याशी संवाद साधण्यात आला आहे.

मिजान खान याने गोव्यातील विविध व्हिडिओ शेअर केले आहेत. यात अनेक व्हिडिओत त्यांने परदेशी पर्यटक महिलांशी संवाद साधला आहे. दरम्यान, त्याच्यावर परदेशी महिलांवर लैंगिक शेरेबाजी करुन त्रास दिल्याचा आरोप केला जात आहे.

मिजान खाने याने गोव्यातील असे अनेक व्हिडिओ युट्युबवर शेअर केले आहेत. दरम्यान, तक्रार समोर आल्यानंतर पोलिसांनी याची दखल घेतली असून, प्रकरणाचा तपास केला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close