क्राइम
हॉटेल च्या फ्रिजर मध्ये सापडला तरुणाचा मृतदेह

लखनौ / नवप्रहार डेस्क
तीन दिवसांपासून बंद असलेल्या दुकानात जेव्हा दुकानदार पोहचला आणि त्याने आपला डीप फ्रीजर उघडला तेव्हा त्याला एका तरुणाचा मृतदेह आढळला. त्याने लगेच या बद्दल पोलिसांना कळवले. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठत चौकशीला सुरवात केली आहे.
हा तरुण शनिवारी दुपारपासून बेपत्ता होता . त्याचे नाव विजय पाल (३८) असल्याचे समजते. उत्तर प्रदेशातील लखनऊमधील एका व्हेज बिर्याणी शॉपच्या फ्रीजरमध्ये विजयचं शव सापडल्याचं पोलिसांनी सांगितलं.
काय आहे प्रकरण?
लखनऊमधील जीसीआरजी कॉलेजच्या समोर असलेल्या व्हेज बिर्याणीच्या दुकानातील फ्रीजरमध्ये विजयची बॉडी सापडली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हे दुकान तीन बाजूंच्या टिनच्या भिंतींनी तात्पुरतं बांधलं आहे. त्याला गेट नाही. ज्या फ्रीजरमध्ये विजय सापडला, तो डिस्कनेक्ट केलेला होता. तर दुकान गेल्या तीन दिवसांपासून बंद होते.
“हे एक तात्पुरते व्यवस्था केलेले दुकान आहे, ज्याला गेट नाही. फ्रीजर देखील डिस्कनेक्ट केलेला आहे. फ्रीजरमध्ये एका तरूणाची बॉडी आढळली आहे. त्याचे नाव विजय पाल असल्याची ओळख पटली आहे. त्याच्या शरीरावर कोणतीही स्पष्ट जखम नाही. आम्ही कुटुंबातील सदस्यांशी संपर्क साधत आहोत. मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही” असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
बक्षीच्या तालाब येथील रहिवासी असलेला दुकान मालक अजय सामान घेण्यासाठी आल्यावर त्याला बॉडी आढळली. डीप फ्रीजरमध्ये शोधत असताना त्याला विजयचं शव सापडलं आणि त्याने ताबडतोब पोलीस अधिकाऱ्यांना कळवलं.
चपलांच्या जागांमुळे संशय
पोलिसांनी घटनास्थळी सापडलेला त्याचा मोबाईल फोन आणि आधार कार्डवरून मृताची ओळख पटवली. त्यांना त्याच्या पादत्राणांबद्दल एक विचित्र तपशील देखील आढळला, विजयची एक चप्पल कॉलेजजवळील रस्त्याच्या कोपऱ्यावर आढळली, तर दुसरी दुकानात आढळली.



