घाटंजी तहसील कार्यालयात शौचालय व लघुशंकेसाठी अधिकारी,कर्मचारी, नागरिकांना घ्यावा लागतो निवडणूक भितीच्या मागील बाजूच्या आधार
घाटंजी तालुका प्रतिनीधी- सचिन कर्णेवार
घाटंजी गेल्या काही दिवसापासून वातावरणातील बदलामुळे उन्हाचा पारा चांगलाच वाढत चालला आहे. मात्र घाटंजी तहसील कृषी कार्यालया बँका येथे येणाऱ्या नागरीकांना पिण्याच्या घोटभर पाण्यासाठी व लघुशंकेसाठी शोधाशोध करावी लागते.नागरिक विविध कामानिमित्त तहसिल येथे येत असतात. सध्या उन्ह चांगलेच तापत आहे अंगाची लाही लाही होत आहे पण तहसील कृषी कार्यालय तसेच परिसरात पिण्याचे पाण्यासाठी राजनांची थातुर- मातूर व्यवस्था असून त्यात अस्वच्छ पाणी असून त्यात स्वच्छ पाण्याची सुविधा उपलब्ध नाही.यामुळे कामानिमित्त इथे येणाऱ्यांना नागरिकांना पाण्यासाठी शोधाशोध करावी लागत आहे.दुपारी तसेच इतर वेळेस तहसील कार्यालय परिसरात असलेल्या कॅन्टिन वर लोकांना पाणी पिण्यासाठी जावे लागते नाईलाजाने पाणी पिण्यासाठी पाणी बाटली घ्यावी लागते किंवा चहा तरी प्यावा लागतो. रेकॉर्ड रूमकडे अस्वच्छ शौचालय असून त्यात पाण्याअभावी पूर्ण दुर्गंधी सुटली आहे येथील अधिकारी व नागरिकांना लघुशंकेसाठी महिला पुरुष यांना निवडणूक विभागातील भीतीचा आधार घ्यावा लागतो.स्वच्छ भारत अभियानाची जनजागृती शासन करत स्वच्छता पाळा अशा संदेश व जनजागृती करत असताना तहसील कार्ययात अधिकारी व कर्मचारी नागरिक यांना उघड्यावर शौचालय व लघुशंकेसाठी जावे लागते यापेक्षा दुर्दैव काय व लाजिरवाण काय!. अशी अवस्था कृषी विभाग ,बँका व शासकीय कार्यलयातआहे तेव्हा सर्व कार्यलयात थंड पानी किंवा रांजण स्वच्छ ठेवून पाणपोयी तरी सुरू करावी अशी नागरीक भावना व्यक्त करत आहे.तहसील कार्यलयात
आस्थापना विभागात असलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी त्यांच्या दालनातच थंडगार पाण्याची व्यवस्था आहे. काही अधिकाऱ्यांना पाण्याच्या बाटल्या ची व्यवस्था आहे. एखाद्याला तहान लागली अधिकारी यांच्या टेबलजवळ बाहेरची व्यक्ती पाणी पिण्यासाठी गेली तर हे कसे काय आले या अविर्भावात तेथील कर्मचारी त्या व्यक्तीकडे बघत असतात त्यामुळे तिथे सहसा बाहेरून आलेले लोक पाणी पिण्यास जाण्याचे टाळतात. या गंभिर बाबीवर तहसिलदार व संमंधीत विभागाणी गांभिर्याणी लक्ष द्यावे ही मागणी जनसामान्यातून येत आहे.