तिने आधारकार्ड अपडेट केले आणि पोलिसांचे काम हलके झाले
मुंबई / नवप्रहार मीडिया
म्हणतात न की कानून के हाथ बहोत लंबे होते है याची प्रचिती नुकतीच एका प्रकरणात आली. एक महिला मागील 5 वर्षांपूर्वी अचानक बेपत्ता झाली होती. महिलेने तिचा लूक बदलून, दुसरे लग्न करत नवं आयुष्य देखील सुरू केले. ऑनलाईन ओळख नष्ट केल्याने तिचा शोध घेण्यास अडचण येत होती.
अखेर पाच वर्षानंतर महिलेचा गोव्यात शोध लागला आहे. तेलंगणाच्या महिला सुरक्षा आणि मानवी तस्करी प्रतिबंध टीमला महिलेचा शोध घेण्यात यश आले आहे.
हुमायूनगर येथून 29 जून 2023 रोजी 36 वर्षीय महिला बेपत्ता झाली. महिला बेपत्ता झाल्यानंतर तिने तीचा लूक बदलला, स्वत:ची डिजिटल ओळख नष्ट केली तसेच, तिने दुसरे लग्न देखील केले आणि महाराष्ट्रातील एका स्वंयसेवी संस्थेसोबत कामाला सुरुवात करत नवे आयुष्य सुरु केले.
महिलेच्या पालकांनी हिबिएस कॉर्पस याचिका दाखल केल्यानंतर महिलेचा पतीशी वाद झाल्याचे समोर आले. महिलेने तिचे आधार कार्ड अपडेट केल्यानंतर तिच्याबद्दल पहिला संकेत समोर आला. महिला गोव्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. डिजिटल तंत्रज्ञानाची मदत घेऊन पोलिसांनी महिलेची ओखळ पटवली.
महिला यापूर्वी देखील दोनवेळा 2014 आणि 2015 वर्षात बेपत्ता झाली होती. पतीशी वाद सुरु असल्याचे सांगितले जाते, दरम्यान 2018 मध्ये महिला बेपत्ता झाल्यानंतर सासरचे हुंडा मागत असल्याचा आरोप करत तिच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.बेपत्ता झालेल्या लोकांचा डिजिटल पद्धतीने शोध घेत असताना ही थोडी वेगळी केस समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. महिलेने तिची जुनी ओळख पुसून काढत नव्याने आयुष्य सुरू केल्याची घटना थोडी विचित्र वाटली.
महिलेने स्वेच्छेने घर सोडल्याचे पोलिसांच्या तपास समोर आले. पण, पालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर महिला सुरक्षा आणि मानवी तस्करी प्रतिबंध टीमच्या मदतीने याप्रकरणाच्या तपासाला पुन्हा सुरुवात झाली.
महिलेचे आधार कार्ड तेलगु भाषेतून मराठीत अपडेट झाले, त्यावर धर्म आणि पतीचे नाव देखील बदलले. त्यानंतर महिलेच्या नव्या ओळखीसह पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. दरम्यान, पोलिसांच्या तपासाला यश आले आणि महिलेचा गोव्यात शोध लागला.