हटके

हा व्हिडीओ पाहून तुमचाही उडेल थरकाप 

Spread the love
              सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यातील काही मजेशीर ,।मन प्रफुल्लित करणारे, काही मनावर प्रभाव टाकणारे काही भयानक तर काही मनाचा थरकाप उडवणारे असतात. असाचं एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.प्रथमदर्शनी पाहण्यात हा अपघात वाटतो पण वास्तविक  तो अपघात नसून आत्महत्या आहे. हा व्हिडीओ बघितल्यावर अनेक लोक कॉमेंट्स करत आहेत की आता अपघात झाल्यास पोलीस हिट अँड रन ची केस बनवतील काय ?

. या व्हायरल व्हिडीओत ट्रक सुरू होताच एक तरुण मध्येच उडी मारताना दिसतो आणि ट्रकच्या चाकाखाली येतो. हा धक्कादायक व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओ एका रस्त्यावरील आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक ट्रक सिग्ननवर थांबलेला दिसत आहे. ट्रकच्या शेजारी एक तरुण उभा आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला वाटेल की हा तरुण रस्ता ओलांडण्यासाठी थांबलेला आहे पण पुढे जे काही होते, ते पाहून तुम्हीही डोके धराल. व्हिडीओत पुढे दिसते की सिग्नल सुटल्यावर ट्रक चालक जसा ट्रक सुरू करतो तसा हा तरुण ट्रकच्या मधोमध उडी मारतो आणि ट्रकच्या चाकाखाली येतो. एका क्षणात होत्याचं नव्हतं होतं. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. ही आत्महत्या आहे की अपघात, असा प्रश्न तुम्हालाही पडू शकतो. विशेष म्हणजे या अपघातात ट्रक चालकाची कोणतीही चूक नाही. हा तरुण आत्महत्येच्या उद्गेशाने चालत्या ट्रकमध्ये उडी मारतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही आश्चर्य व्यक्त कराल की या तरुणाने असे का केले असावे. ही संपूर्ण घटना ट्रक चालकाच्या मागे उभे असलेल्या कार चालकाने त्याच्या कॅमेरामध्ये कैद केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close