तुम्हाला माहीतीये का लिफ्ट मध्ये का लावतात आरसा
पूर्वी इमारती या लहान असायच्या. पण वाढत चाललेली लोकसंख्या आणि जागेची कमी यामुळे फ्लॅट सिस्टीम अस्तित्वात आली. मोठ्या शहरात 30 -40 मजली इमारती आतित्वात आल्या.त्यामुळे अश्या मोठ्या इमारतीं मध्ये लिफ्ट ची आवश्यकता भासू लागली. पण लिफ्ट च्या स्पीड मुळे अनेक तक्रारी येऊ लागल्या. तेव्हा त्यात केलेल्या संशोधनां नंतर त्यात काच बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसल्यावर त्याचा उपयोग सुरू झाला.
लिफ्टच्या सहाय्याने बहुमजली बिल्डिंगवर अवघ्या काही सेकंदांत तुम्ही पोहोचतात. अनेक लिफ्टमध्ये आरसा लावण्यात आलेला असतो हे तुम्ही कधी ना कधी पाहिले असेलच. पण हा आरसा नेमका कशासाठी असतो?
वैज्ञानिकांनी लिफ्टचा शोध लावून आपला बराच त्रास आणि वेळ वाचवला आहे. लिफ्टचा वापर केल्याने आपली एनर्जी सुद्धा वाचते. या लिफ्टमध्ये आरसा सुद्धा असतो. अनेकांना वाटते की, आपला चेहरा पाहण्यासाठी किंवा ऑफिसमध्ये जाण्यापूर्वी चेहरा कसा दिसतो हे पाहण्यासाठी आरसा असतो. पण खरंच हे कारण आहे का? जाणून घेऊयात लिफ्टमध्ये आरसा असण्यामागचं खरं कारण काय आहे.
काय आहे खरं कारण?
हॉटेलमधील लिफ्ट, बिल्डिंगमधील लिफ्ट तसेच ऑफिसमधील लिफ्टमध्ये आरसा लावण्यात आलेला असतो. लिफ्टमध्ये लावण्यात आलेला हा आरसा सुरुवातीपासूनच बसवण्यात येत होता असे नाहीये. यापूर्वी लिफ्टमध्ये कोणत्याही प्रकारचा आरसा नसायचा मात्र, नंतर आरसा लावण्याचा निर्णय घेण्यात आला. पण पूर्वीच्या लिफ्टमध्ये आरसा नव्हता मग आता आरसा का लावण्यात येऊ लागला बरं? जाणून घ्या त्यामागचं कारण काय आहे.
पूर्वीच्या काळात लिफ्टमध्ये आरसा बसवलेला नसायचा आणि त्यामुळे लिफ्टमधून प्रवास करताना स्पीड खूप असल्याच्या तक्रारी अनेकांच्या येत होत्या. त्यामुळे अनेकांना अस्वस्थ वाटू लागायचे. तर काहींना भीती वाटू लागायची. अशा प्रकारच्या नागरिकांच्या तक्रारी आल्यावर लिफ्ट उत्पादक कंपन्यांनी याच्या संदर्भात अभ्यास केला. त्यावेळी असे समोर आले की, लिफ्टमधून प्रवास करताना नागरिकांचे लक्ष हे भिंतींकडे असायचे आणि त्यामुळे लिफ्ट खूप वेगाने जात असल्याचं त्यांना वाटायचे.
पण लिफ्टचा वेग हा जास्त नसायचा तर लिफ्ट नॉर्मल वेगानेच जात असे. त्यामुळे लिफ्ट उत्पादक कंपन्यांनी यावर एक उपाय शोधून काढला. हा उपाय म्हणजे लिफ्टमध्ये आरसा लावण्यात यावा. जेणेकरुन लिफ्टमधून प्रवास करताना नागरिकांचे लक्ष आरशांकडे जाईल. आता तसेच होऊ लागले आहे नागरिकांचे लक्ष लिफ्टमधील आरशाकडे असते आणि त्यामुळे त्यांना आपला लिफ्टमधील प्रवास कधी पूर्ण होतो हे कळत सुद्धा नाही. तसेच त्यांना अस्वस्थ वाटत नाही आणि लिफ्टचा स्पीड खूप जास्त असल्याचंही त्यांना वाटत नाही.