काका पुतण्यात गुप्त बैठक ? उद्योगपतीच्या घरी बैठक झाल्याची चर्चा
निवडणूक आयोगातील प्रकरणा ला अनुसरून भेट असल्याचे भाकीत
पुणे / नवप्रहार मीडिया नेटवर्क
राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित दादा काही आमदारांना सोबत घेऊन सरकार मध्ये शामिल झाले. एकीकडे काका पुतण्यात बेबनाव झाल्याची चर्चा सुरू असताना काकू प्रतिभाताई यांच्या वर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर दादा त्यांच्या भेटीसाठी घरी गेले होते. त्यानंतर त्यांच्या सोबत आलेल्या आमदारांना घेऊन यशवंतराव चव्हाण सेंटर येथे दोनदा भेट घेतली होती.आता पुण्यात काका आणि पुतण्या यांच्यात उद्योगपतीच्या घरी झालेल्या भेटीची चर्चा होत आहे. पण अद्याप या भेटीला दुजोरा मिळाला नसल्याचे समजत आहे. तर ही भेट निवडणूक आयोगात सुरू असलेक्या प्रकरणाला अनुसयून असावी असे भाकीत वर्तविण्यात येत आहे.
चांदणी चौकातील कार्यक्रमानंतर शरद पवार आणि अजित पवार पुण्यातील कोरेगाव पार्क येथील एका बड्या उद्योगपतीच्या घरी दाखल झाले. या नेत्यांमध्ये बराचवेळ चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीला जयंत पाटीलही उपस्थित असल्याची चर्चा आहे. या भेटीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये जर भेट झाली असेल तर त्यात आश्चर्य काहीच नसल्याची प्रतिक्रिया दोन्ही नेत्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर तीनवेळा अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अजित पवार 14 जुलैला शरद पवार यांच्या घरी गेले होते. तिथे त्यांची शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत भेट झाली होती. मात्र, काकींच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. तिथे राजकीय चर्चा झाली नसल्याची प्रतिक्रिया त्यावेळी अजित पवार यांनी दिली होती.
राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, तर अन्य आठ आमदार हे मंत्री झाले. त्यानंतर पहिल्याच पावसाळी अधिवेशनाच्या दोन दिवस आधी अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांची वायबी चव्हाण सेंटर येथे अचानक भेट घेतली होती. तर लगेच त्याच्या दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीच्या इतर बंडखोर आमदारांना घेऊन अजित पवार यांनी दुसऱ्यांना शरद पवार यांची वायबी चव्हाण सेंटर येथे भेट घेतली होती. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यावेळी शरद पवार यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली होती. तर यातून मार्ग काढण्याची विनंती राष्ट्रवादीच्या बंडखोर नेत्यांनी शरद पवार यांच्याकडे केली होती, अशी माहिती त्यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी दिली होती.
राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर हा विषय निवडणूक आयोगाकडे गेला होता. त्यावेळी दोन्ही गटांनी वेगवेगळे पत्र निवडणूक आयोगाला दिले होते. आमच्या गट नसून, एकच पक्ष असल्याचे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात म्हटले होते. तर मी भाजपासोबत जाणार नसल्याची प्रतिक्रियाही त्यावेळी शरद पवार यांनी दिली होती. तर लगेचच लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात शरद पवार आणि पंतप्रधान मोदी हे एकाच मंचावर आले होते. तर पहाटेच्या शपथविधीलाही शरद पवार यांची सहमती होती. त्यामुळे शरद पवार हे कधी काय डाव खेळतील हे सांगता येणार नाही. त्यामुळे शनिवारी जरी बैठक झाली असली तरी त्यात नेमकी काय चर्चा झाली हे अजून स्पष्ट झालेले नाही.