तुम्ही म्हणाल छे काही तरीच काय ? अहो पण हे खरे आहे ना !
पूर्वी जर तुम्हाला कोणी म्हटले की चंद्रावर पाणी आहे तर तुमचा विश्वास बसने कठीण होते. पण विज्ञान जसजशी प्रगती करत गेला तसतसे चंद्रावरील गुपित उलगडत गेलं.ईतके सगळे असतांना तुम्हाला जर कोणी म्हटले की चंद्रावर एका इसमाची कबर आहे. तर म्हणाल छे काही तरीच काय ? कारण चंद्रावर भविष्यात मानवी वस्ती बसेल ! अवकाश पर्यटन सुरू होईल तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल पण चंद्रावर कबर यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण ही बातमी वाचल्यावर तुम्हाला या गोष्टीवर विश्वास करावाच लागेल.
अंतराळात असंख्य गुपितं असल्यामुळे याबाबत प्रत्येकाला याबाबत नेहमीच कुतूहल असल्याचं पाहायला मिळतं. अंतराळाच्या बाबतच्या काही रंजक गोष्टी तुम्हांला माहित नसतील. अंतराळामध्येही एका व्यक्तीची कबर आहे. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. चंद्रावर कबर असणारी ‘ती’ व्यक्ती नेमकी कोण आणि त्याची कबर अंतराळात असण्यामागचं कारण माहितीय?
चंद्रावर पहिलं पाऊल नील आर्मस्ट्राँग यांनी ठेवलं. नील आर्मस्ट्राँग नंतर अनेक लोक चंद्रावर गेले आणि पृथ्वीवर परतले. पण जगातील एका व्यक्तीची कबर चंद्रावर बांधण्यात आली आहे. हा जगातील असा एकमेव व्यक्ती आहे, ज्याची कबर पृथ्वीपासून लाखो किलोमीटर दूर चंद्रावर बनवण्यात आली आहे. चंद्रावर कबर बांधलेल्या या व्यक्तीचं नाव यूजीन शूमेकर असं (Eugene Shoemaker) आहे. यूजीन शूमेकर जगातील महान शास्त्रज्ञ होते.
यूजीन मर्ले शूमेकरने जगातील सर्व अंतराळवीरांना प्रशिक्षण दिलं. त्यांनी युरेनियमचाही शोध लावला. हे त्याचं पहिले मिशन होते. शास्त्रज्ञ युजीन मर्ले शूमेकर (Eugene Merle Shoemaker) यांना अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी विज्ञान क्षेत्रात केलेल्या अभूतपूर्व कार्यासाठी सन्मानित देखील केलं होतं. शूमेकर यांना रस्ता अपघातात आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर नासाच्या (NASA) मदतीने चंद्रावर त्यांची कबर बनवण्यात आली. नासाने युजीनच्या अस्थींची राख चंद्रावर नेऊन पुरली.
अंतराळात लपली आहेत अनेक गुपितं
जगभरातील अनेक देश सध्या अवकाश संशोधनावर कोट्यवधी खर्च करत असून भविष्यासाठी ही गुंतवणूक करत आहेत. यामध्ये भारतही मागे नाही. भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रो आघाडीवर आहे. सध्या इस्रोची गणना जगातील सर्वोत्तम अंतराळ संस्थांमध्ये केली जाते. मंगळयान, चांद्रयान यांसारख्या अनेक यशस्वी मोहिमा पार पाडल्यानंतर इस्रो आता चांद्रयान-3 प्रक्षेपित करण्याच्या तयारीत आहे. इस्त्रो 14 जुलै 2023 रोजी दुपारी 2.35 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून चांद्रयान 3 प्रक्षेपित करणार आहे. जर चांद्रयान 3 लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरल्यावर भारत चंद्रावर उतरणारा चौथा देश ठरेल.