राजकिय

सरवणकर आपल्या निर्णयावर ठाम  ; तिहेरी लढतीची शक्यता 

Spread the love

मुंबई  / नवप्रहार डेस्क

                    माहीम मतदार संघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे पहिल्यांदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात उमेदवार देण्याचा महायुती ने निर्णय घेतला आहे. पण शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण ते आपल्या निर्णयावर ठाम असल्याने याठिकाणी तिहेरी लढत होण्याची चिन्हे दिसत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी रात्री सदा सरवणकर यांना भेटायला बोलावून त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते निवडणुकीतून माघार घेतील, अशी शक्यता होत असतानाच सरवणकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

दादर माहिम मतदारसंघात शिवसेना भवन असल्याने येथील विजय पराजयाला वेगळेच महत्व आहे. शिवसेनेवर दावा सांगितल्यानंतर आणि पक्षासह चिन्ह देखील मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेना भवन असलेल्या दादर माहिम मतदारसंघात तीन टर्मचे आमदार सदा सरवणकर यांना पुन्हा उमेदवारी दिली. दुसरीकडे दादर माहिम जिंकण्यासाठी विभागप्रमुख महेश सावंत यांना उद्धव ठाकरे यांनी रिंगणात उतरवले आहे. तर आदित्य ठाकरे यांच्यानंतर अमित ठाकरे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने दादर माहिमची लढत तिरंगी होणार आहे. अमित ठाकरे यांना निवडणूक जड जाऊ नये किंबहुना त्यांना पाठिंबा द्यावा, यासाठी महायुतीतील राज ठाकरे यांचे निकटवर्तीय नेते प्रयत्नशील आहेत.

परंतु सदा सरवणकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करत निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचे ठासून सांगितले. मी मंगळवारी सकाळी १० वाजता अर्ज भरणार असल्याचे सांगत महायुतीतील कोणत्याही प्रमुख नेत्याने मला निवडणुकीतून माघार घेण्याविषयी सांगितलेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. कुणासाठी निवडणुकीतून माघार घेण्याचा विषयच येत नाही. वर्षा वर रविवारी रात्री माझ्या उमेदवारीबाबत चर्चा झालीच नाही, असेही ते म्हणाले.

दुसरीकडे अमित ठाकरेंना पाठिंबा द्यायला हवा, असे सांगताना सरवणकर यांनी माघार घ्यावी, असे अप्रत्यक्षपणे शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी सांगितले होते. त्यावर बोलताना सरवणकर यांनी केसरकरांना सुनावले आहे. दीपक केसरकर यांनी स्वत:चा उमेदवारी अर्ज माघार घेऊन मनसेला पाठिंबा द्यावा, असा पलटवार सरवणकर यांनी केला आहे. तीन वेळा नगरसेवक तीन वेळा आमदार म्हणून गेली ३० वर्षे मी प्रतिनिधित्व करतोय. मतदारसंघात जनतेची मोठ्या प्रमाणात काम केली आहेत. जनतेला काम करणारा उमेदवार हवा आहे. अडीअडचणींना धावून जाणारा उमेदवार आहे, असे सरवणकर म्हणाले.

महेश सावंत आणि अमित ठाकरे तुमच्यासमोर असणार आहेत, लढाई कठीण वाटतेय का? असे विचारले असता, निवडणुकीत लोक उमेदवाराचे काम पाहतात, त्यांना कामाचा माणूस हवा अशतो. मतदारांना जे हवंय, त्यांना आम्ही गत पाच वर्षात ते दिले आहे, त्यामुळे पुन्हा माहिम दादरचा आमदार मीच असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close