सामाजिक
मेडिकल कॉलेज वेळा येथे नेण्याचा आमदारांचा घाट – अतुल वांदिले
जवळच्या उद्योगपती मित्रांना फायदा पोहचवण्यासाठीच हा उपदव्याप
वर्धा / आशिष इझनकर
हिंगणघाट येथे मंजूर झालेले मेडिकल कॉलेज वेळा येथे नेण्याचा आमदारांचा घाट असून हा सगळा उपदव्याप आमदार आपल्या जवळच्या उद्योगपती मित्रांना फायदा व्हावा यासाठी करत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेश सरचिटणीस अतुल वादीले यांनी केला आहे.
पत्रकार परिषदेत बोलतांना वांदिले म्हणाले की महाराष्ट्र शासनाने मौजा हिंगणघाट ता. हिंगणघाट जि वर्धा या ठिकाणी शासकीय महाविद्यालय प्रस्तावित केलेले आहे. परंतु दि. १७ जून २४ च्या मा. जिल्हाधिकारी वर्धा यांनी हिंगणघाट पासून १० ते १५ कि.मी. अंतरावरील मौजा वेळा (ता. हिंगणघाट) येथे मेसर्स मल कंट्रक्शन प्रा.लि. नागपूर यांचेकडून १५.९९ हेक्टर दान करीत असल्याचे तहसीलदार यांचें पत्रावरून ही जागा वैद्यकीय महाविद्यालयासाठी मंजूरीबाबत प्रधान सचिव वैद्यकीय शिक्षण खाते व आयुक्त मुंबई यांना परवानगीसाठी पाठविलेले आहे. यावरून असे दिसून येते की, असे खेदाने म्हणावे लागत आहे. हिंगणघाट येथे कागदोपत्री शासकीय महाविद्यालय प्रस्तावित असले तरी प्रत्यक्षात वेळा येथे दान स्वरुपात मिळणाऱ्या ४० एकर जमिनीवर हे शासकीय मेडिकल महाविद्यालय होणार असल्याचे दिसून येत आहे. हे मंजूर कराण्यासाठी स्थानिक, आमदार हे प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.
मागील आठवड्यांत मोठा गाजावाजा करून १०० बेडचे हॉस्पिटलला ४०० बेडमध्ये श्रेणीवर्धन करून १५१ कोटी रुपये निधी प्राप्त झाल्याचा व त्याबाबतच्या चलचित्र देखावा समाननीय आमदार यांनी एका कार्यक्रमांत पत्रकार व प्रतिष्ठित नागरिकांना समक्ष प्रस्तुत केला होता. विद्यमान १०० बेडच्या हॉस्पीटल मध्ये सिटी स्कॅन, सोनोग्राफी मशीन, मॉडयुलर ओटी, साथी ओटी २५ खाटांचे मॉड्युलर आयसीय रक्तपेढी या सर्व यांत्रीक उपलब्धता असल्याने त्या हाताळण्यासाठी डॉक्टरांचा अभाव
आहे त्यामुळे येथील रुग्णांना उपचारासाठी जवळच्या मेडिकल कॉलेज मध्ये रेफर करण्यात येते. आताही ४०० बेडच्या हॉस्पिटलच्या बांधकामानंतर सुद्धा हीच अवस्था राहण्याची स्थिती आहे. येथे तज्ञ डॉक्टरा अभावी उपचार होत नसल्याच्या मारणावरून वेळा किंवा सेवाग्राम, सावंगी येथील मेडिकल कॉलेजमध्ये जाणे नशिबी आहेच. १०० बेड ऐवजी ४००, बेड जरी झाले तरीपण अवस्था मात्र तीच कायम राहणार आहे. त्यामुळे अवस्था कायमस्वरुपी बदलविण्यासाठी शासनाने मूळ आदेशात हिंगणघाटला प्रस्तावित केल्यानंतर हिंगणघाट शहरातील उपजिल्हा रुग्णालय व लगतच्या ४१ एकर जागेतच व्हावे व ही जागा अपुरी पडत असल्यास जवळच्या वेअर हाउस मागील २० एकर शासकीय जागा उपयोगांत आणावी. अशी एकूण ६१ एकर जागा शासनाच्या ताब्यात आहे. मात्र स्थानीक आमदार केवळ आपल्या मूठभर उद्योगपती मित्रांचा करोडो रुपये फायदा कराण्यांसाठी वेळा या जागेचा आग्रह धरीत असल्याचे आमचे स्पष्ट मत आहे.
यासंदर्भात शासनाने १५ जुलै पर्यंत सदर शासकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरांत मंजूर न झाल्यास भव्य मोर्चा काढून व आक्रमक भूमिका घेण्यांत येईल असे त्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.