शैक्षणिक

बेला ग्रा.प. चा अनोखा उपक्रम ; उच्चशिक्षित तरुणाईला घेऊन सुरू केली शाळा

Spread the love
भंडारा / संजीव जायसवाल
                जुन्या पेन्शन साठी शासकीय कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप पुकारला असल्याने राज्यातील जवळपास सर्वच कार्यालयातील कामकाज बंद आहे. शाळा सुद्धा बंद आहेत. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून बेला येथील ग्राम पंचायत ने अनोखा उपक्रम सुरू केला आहे. त्यांनी गावातील काही उच्चशिक्षित तरुणांची चमू बनवून त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना शिकवीत आहेत.
राज्यात इतर कर्मचारी संघटनेस हमहाराष्ट्र शिक्षक संघटनेनी १४/०३/२०२३ पासुन बेमुदत संप पुकारलेले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा यामधील सुध्दा शिक्षक संपावर गेलेले आहेत. शिक्षक संपावर गेले असल्यामुळे  गावातील विद्यार्थीचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे दिसुन येत आहे.
विद्यार्थी यांची परिक्षा अगदी तोंडावर असतांनी विद्यार्थीची अभ्यासाची लिंक तुटु नये यासाठी बेला ग्रामपंचायतीने पुढाकार घेवुन गावातील काही उच्च शिक्षीत स्वंयसेवकाची निवड केलेली  बेमुदत संप बंद होत नाहीत. तोपर्यंत  गावातील  सदर स्वयंसेवक  विद्यार्थीना शाळेत जावुन शिकविणार आहेत.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close