शैक्षणिक

जाजू इंटरनॅशनल स्कूलमध्ये विदर्भ लेवल विज्ञान महोत्सवाची यशस्विता

Spread the love

यवतमाळ / प्रतिनिधी
*विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ*, *जाजू इंटरनॅशनल स्कूल यवतमाळ*, *मार्कंडेय पब्लिक स्कूल राळेगाव*, आणि *गुरूकुल इंग्लिश मीडियम स्कूल दिग्रस* यांच्या संयुक्त विद्यमाने *विदर्भ विज्ञान महोत्सव* २१ डिसेंबर २०२४ रोजी यशस्वीपणे संपन्न झाला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष माननीय प्रकाशजी जाजू सर, सचिव माननीय आशिषजी जाजू सर, संचालक प्राचार्या सौ शिल्पा जाजू मॅडम, पुनम जाजू मॅडम, विभा समन्वयिका वसुंधरा साठे मॅडम, प्रो.डॉ. सुरेखा अनिल कालकर, प्रदीप गोडे सर, जयश्री राऊत मॅडम, प्रो.संगीता वेणुरकर मॅडम, प्रशांत पंचभाई सर, नितीन खर्चे सर, मार्कंडेय पब्लिक स्कूल राळेगावच्या मुख्याध्यापिका डॉ. शितल गोकुळवार मॅडम, गुरूकुल इंग्लिश मीडियम स्कूल दिग्रसचे उपमुख्याध्यापक शरीफ सर, जाजू इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका मंजिरी रासपायले मॅडम, सी.एम.सी.एस.प्राचार्य रितेश चांडक सर, जाजू इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक सतीश उपरे सर, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सोबतच विज्ञान मॉडेल सादरीकरणाचे मूल्यांकन करणारे विविध दिग्गजही उपस्थित होते. डॉ. विजया कावलकर मॅडम, गजानन परसोडकर सर, डॉ.चंद्रशेखर कासार सर, प्रशांत शिंगोटे सर, आद्या साठे कुलकर्णी मॅडम, मेघा भास्करवार मॅडम, अरूण लोणारकर सर, उमेश इंगोले सर, प्रो. डॉ. चव्हाण सर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सर्जनशीलतेला वाव देणे, त्यांच्यातील सुप्त गुणांचा विकास करणे, वैज्ञानिक जागरूकता वाढविणे, नवनिर्मितीला प्रेरणा देणे, सहयोगाला प्रोत्साहन देणे तसेच “आजचा विद्यार्थी भविष्याचा संशोधक” या दूरदृष्टिकोनातून जाजू इंटरनॅशनल स्कूलमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
यात विविध विषयावर आधारित मॉडेल प्रेझेंटेशन करण्यात आले. यात “पर्यावरण” या विषयावर जाजू इंटरनॅशनल स्कूलच्या सृष्टी तुरक आणि टिशा जयपुरिया यांनी प्रथम तर गुरूकुल इंग्लिश मीडियम स्कूल दिग्रसच्या राधिका मिश्रा आणि खुशी तायडे यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. “हेल्थ” या विषयावर एस.पी.एम घाटंजी स्कूलची कार्तिकी डेहनकर प्रथम आणि शांती निकेतन नेर स्कूलची अनुष्का बाडूकणे द्वितीय क्रमांक प्राप्त केला. “ॲग्रीकल्चर” या विषयावर मार्कंडेय स्कूल राळेगावचा पारितोष आगलावे व साईज्योत तेलंगे प्रथम आणि जाजू इंटरनॅशनल स्कूलचा चिराग जांगिड आणि श्रीकांत चावलेवार द्वितीय ठरला. “पोस्टर” या गटात संस्कार इंग्लिश मीडियम स्कूलचा नयन आडे प्रथम आणि जाजू इंटरनॅशनल स्कूलचा समर्थ तेजने द्वितीय ठरला. “रंगोली” यात संस्कार इंग्लिश मीडियम स्कूल यवतमाळची ऋतुजा ठाकरे प्रथम आणि जाजू इंटरनॅशनल स्कूलची गुंजन अग्रवाल द्वितीय ठरली.
तसेच विद्यार्थी विज्ञान परिषदेत “गट अ” मधून मार्कंडेय पब्लिक स्कूल राळेगावची अनया कुबडे प्रथम, जाजू इंटरनॅशनल स्कूलचा समर्थ जिरापुरे द्वितीय, “गट ब” मधून पोदार इंटरनॅशनल स्कूलची इंसीया बॉम्बेवाला प्रथम आणि जाजू इंटरनॅशनल स्कूलची विश्वजा चौधरी द्वितीय, “गट क” मधून जाजू इंटरनॅशनल स्कूलची सकिना बॉम्बेवाला प्रथम आणि पोदार इंटरनॅशनल स्कूलची हृदया मेटे द्वितीय ठरली. “गट ड” मधून सेंट अलॉयसेस स्कूलची उन्नती वानखेडे प्रथम आणि मार्कंडेय पब्लिक स्कूल बरडगावचा साई उंबरकर द्वितीय ठरला.
सर्व विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शुभाशीर्वाद देऊन प्रमाणपत्र व मोमेंटो देण्यात आले. यावेळी भारत माता पूजन, दीपप्रज्वलन, मार्कंडेय पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांद्वारे गीत प्रस्तुतीकरण, गुरूकुल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी “विज्ञान आणि परंपरा यांची एकता” यावर आधारित नृत्य सादर केले. जाजू इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गीतावर सांस्कृतिक नृत्य व गिटार परफॉर्मन्स सादर केला. तसेच वर्ग १ ते ३ च्या विद्यार्थ्यांनी “संशोधक रॅम्प वॉक” सादर केला.
सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीरा पटेल, दीप्ती श्रीवास्तव आणि पूनम मॅडम यांनी केले. शाळेच्या समन्वयिका सुचिता पारेख, वैशाली तुरक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वीपणे पार पडला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close