सामाजिक न्याय पर्व अंतर्गत वाचन प्रेरणा दिन साजरा
शासकीय मुलीची निवासी शाळा हिंगणगाव,ता.धामणगाव रेल्वे येथे आयोजन
धामणगाव रेल्वे / सामाजिक न्याय विभागा अंतर्गत, सामाजिक न्याय पर्व 1 एप्रिल ते 1 मे पर्यंत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने शासकीय निवासी शाळा हिंगणगाव येथे वाचन प्रेरणा दिन उपक्रम अंतर्गत भारतीय संविधान मधील कायदेविषयक वाचन कार्यक्रम घेण्यात आला, कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्रीमती तिरपुडे ( मुख्याध्यापक) तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे (समतादूत ) श्रीमती सरोज आवारे, प्रणिती राठोड (अधीक्षिका ),उपस्थित होत्या, कार्यक्रमाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो पूजेने करण्यात आले, अध्यक्ष तिरपुडे यांचे स्वागत डोंगरे मॅडम यांनी केले, तसेच प्रमुख पाहुणे समतादूत सरोज आवारे यांचे स्वागत मुख्याध्यापिका तिरपुडे यांनी केले, अधीक्षिका प्रणिती राठोड यांचे स्वागत आकरे मॅडम यांनी केले .प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या समतादूत सरोज आवारे यांनी वाचन प्रेरणा दिन या उपक्रम निमित्त उपस्थित विद्यार्थिनी यांना मार्गदर्शन केले मार्गदर्शन करताना समतादूत सरोज आवारे म्हणाल्या प्रत्येक विद्यार्थिना वाचनाचा छंद असणे आवश्यक आहे, वाचनाने स्वतः हचा विकास होतो पण त्याच बरोबर सामाजिक विकास करण्यासाठी प्रेरणा मिळते, एक पुस्तक शंभर मित्रा प्रमाणे असते त्यातून सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते,असे समतादूत सरोज आवारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, कार्यक्रमाच्या अध्यक्ष मुख्याध्यापिका तिरपुडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाला सर्वांगीण विकास करण्यासाठी वाचन गरजेचे आहे अशाप्रकारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थिनी केले कार्यक्रमला उपस्थित, मुख्याध्यापिका तिरपुडे मॅडम, ग्रंथपाल लोखंडे सर , मेश्राम सर ,डोंगरे मॅडम, घुले सर, आकरे मॅडम उपस्थित होत्या अशाप्रकारे सामाजिक न्याय पर्व अंतर्गत वाचन प्रेरणा दिन उपक्रम राबविण्यात आला