श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय येथे महिला दिन साजरा
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत समतादूत सरोज आवारे व सुजाता गायकवाड तसेच डॉक्टर चौके प्रमुख वक्ता म्हणून लाभले कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री संत शंकर महाराज व सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली समतादूत सरोज आवारे यां विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या आपण सावित्रीच्या लेकी आहो आणि आपण स्वतःपुरता विचार न करता समाजातील गरजू महिलांचा सामाजिक व आर्थिक दर्जा उंचावण्यासाठी कार्य करणे शिक्षण घेणे म्हणजे स्वतःचा विकास करून स्वतःच्या पायावर उभे राहणे नव्हे तर त्या शिक्षणाचा निस्वार्थपणे समाजातील गरजू लोकांचा व समाजाचा विकास कसा घडेल याचा विचार प्रत्येक विद्यार्थ्यांनी करणे गरजेचे आहे तसेच सुजाता गायकवाड यांनी मार्गदर्शन करताना म्हणाल्या की प्रत्येक महिलेला आपल्या अस्तित्वाची जाणीव असणे गरजेचे आहे तसेच डॉक्टर चौके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले प्राध्यापक वृषाली देशमुख या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या विद्यार्थ्यांनी आपले सुप्त गुण ओळखून त्याला वाव देणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे डॉक्टर बोंद्रे यांनी विद्यार्थ्यांना उपस्थित महिला वर्गांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खुशी राठोड व आभार प्रदर्शन श्रद्धा गोरे यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित सामाजिक न्याय विभाग अंतर्गत समतादूत सरोज आवारे ,,सुजाता गायकवाड, प्रा. देशमुख ,प्रा. भेंडे, प्रा. लांडे, प्रा. जाधव, प्रा. निंबाळकर, प्रा. राऊत, प्रा. बीजाने व प्रा.मुंजे