संभाजी ब्रिगेड महिला आघाडी तर्फे सरोज मंगल कार्यालय येथे महिला दिन साजरा
– महिलांनी महिलांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासासाठी उपक्रम राबवून महिला कोणत्याच क्षेत्रात कमी नाही हेच दाखवून दिलेय. निमित्त होते संभाजी ब्रिगेडच्या महिला आघाडीने आयोजित केलेल्या सांस्कृतिक महोत्सवाचे… वर्ध्याच्या सरोज सभागृहात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य व फॅशन शो हे कार्यक्रम साजरे करण्यात आले. यात महिलांनी आपली कला सादर करीत सर्वांचे लक्ष वेधलेय. यावेळी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आलाय. संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा अनिता येवले यांच्यासह असंख्य महिलांनी या उपक्रमात आपले योगदान दिले आहे.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सरोज किटे लाभल्या होत्या तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सपनाताई निंबाळकर निव इग्लिश अकॅडमि यांनी प्रभावी पालकत्व या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला सोनल ढोमणे संचालिका ढोमणे ज्वेलर्स, आकांक्षा ढोमणे संचालिका ढोमणे ज्वेलर्स,मोनाली ढोमणे संचालिका : ढोमणे ज्वेलर्स, अंजलीताई भामकर संचालिका : फॅब सिग्निचर,अर्चनाताई चाहंदे संचालिका : हंगरी बर्डस कॅफे
योगिताताई इंगळे जिल्हाध्यक्षा : जिजाऊ ब्रिगेड, वर्धा यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी
स्मिताताई नगराळे जिल्हाध्यक्षा : झलकारी सेना, वर्धा.अमरा खान जिल्हाध्यक्षा : जमाते ए – मुस्लिम हिंद महिला विभाग,निताताई भांडवलकर क्षत्रिय मराठा परिषद महिला आघाडी,माधुरीताई झाडे जिल्हा प्रशिक्षण कार्यबाहक, अंधश्रध्दा निर्मूलन समिती,रोहिणीताई बाबर विभागिय प्रमुख : मराठा महासंघ,मृणालताई ढोक पत्रकार, नवराष्ट्र, RNO, मनिषाताई भेंडे संघटक : ओबीसी जनजागृती महिला संघटना,अश्विनीताई काकडे संचालिका : मनस्विनी यांचा सामाजिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.