क्राइम

सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेस अटक ; 25 हजारात पुरवत होती विदेशी तरुणी 

Spread the love

 ठाणे  / नवप्रहार डेस्क

                      विदेशी ( थायलंड ) च्या तरुणींकडून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या महिलेला गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने (एएचटीसी) अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी रविवारी दिली. ग्राहकांकडून ही महिला एका तरुणीमागे 25 हजार रु. घेत असल्याचे समजते. यातील दलाल महिलेला २५ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

वागळे इस्टेट भागातील लुईसवाडीत सर्व्हिस रोडलगतच्या विटस् शरणम हॉटेलमध्ये काही विदेशी तरुणींकडून शरीर विक्रीचा व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चौधरी यांना मिळाली होती. त्याच आधारे अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. पंजाब उगले, उपायुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एएचटीसी कक्षाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चौधरी यांच्यासह जमादार श्रद्धा कदम, दीपक वालघुडे, धनंजय मोहिते, देवानंद चव्हाण, कॉन्स्टेबल पूनम खरात आणि किरण चांदेकर आदींच्या पथकाने 21 जून 2024 रोजी धाड टाकली. एका बोगस गिऱ्हाईकाच्या मदतीने विदेशी तरुणींची मागणी केली. त्यावेळी दलाल विदेशी महिलेने त्याठिकाणी थायलंडच्या तीन मुलींना आणले.

गुन्हा दाखल
एका मुलीसाठी 25 हजारांचा सौदाही दलाल महिलेने यावेळी ठरविला. या मुलींच्या सौद्यानंतर गिऱ्हाईकाने इशारा केल्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून थायलंडच्या दलाल महिलेस अटक केली. तिच्या तावडीतून 30 ते 35 वयोगटातील थायलंडच्या तीन पीडित महिलांची सुटका केली. दलाल आरोपी महिलेविरुद्ध वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पीडित महिला बाल सुधारगृहात
पीडित महिलांना मुंबईतील रेस्कू फाउंडेशन या महिला बाल सुधारगृहात ठेवले आहे. या महिला मुंबईतील जुहू भागात वास्तव्याला आहेत. त्यांनी मुंबईत कोणाकडे आश्रय घेतला होता? ठाण्यात त्यांचे आणखी कोणी साथीदार आहेत का? त्यांना या कामासाठी विदेशातून मुंबई, ठाण्यात कोणी आणले? या सर्व बाबींचा तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close